नालासोपाऱ्यात महिलेवर सामूहिक बलात्कार,तीन नराधमांना अटक.
नालासोपारा : नालासोपाऱ्यात एका विवाहित महिलेवर घरात शिरून तीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून नालासोपारा पोलिसांनी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिम परिसरात राहणारी महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करत असून तिचा पती रिक्षाचालक आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रिक्षा चालक पती रिक्षात सीएनजी भरण्यासाठी मीरा भाईंदर येथे गेला असताना महिला घरात एकटीच असल्याची संधी साधून या तीन नराधमांनी घरात प्रवेश करून आळीपाळीने महिलेवर बलात्कार केला व तिचा पती आल्यावर त्यालाही मारहाण करून तेथून पळ काढला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना काल वसई न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली आहे.याप्रकरणाचा अधिक तपास नालासोपारा पोलिसांकडून करण्यात येत आहे.