ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
मंगळवारी  वज्रेश्वरी येथे सत्संग मेळाव्याचे आयोजन.
आताच शेयर करा
Mar 17, 2025

वज्रेश्वरी :  श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा आयोजन समिती मुंबई च्या वतीने मंगळवार, दि. १८ मार्च २०२५  श्री क्षेत्र वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि.ठाणे श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथे श्री स्वामी समर्थ  परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात. राष्ट्रीय महासत्संग सोहळा तथा विश्वशांती हेतू सामूहिक श्री दुर्गा सप्तशती पठण व श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली यांच्या पावन उपस्थितीत आई भगवतीचे महत्त्वाचे शक्तीपीठ असलेल्या व विशेष करून मुंबई नजिकच्या भक्तांचे प्रमुख दैवत असलेल्या श्री क्षेत्र वज्रेश्वरी  येथे विश्वशांती हेतू राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य गुरुमाऊलींनी अखिल सेवेकरी परिवाराला सोबत घेऊन विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राष्ट्रीय महासत्संग मेळावे आयोजित केले आहेत यामध्ये श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, तुळजापूर, माहूर, सप्तश्रृंगीगड, पावागड (गुजरात), पिठापूर, गाणगापूर, नृसिंहवाडी, भीमाशंकर, शुकताल, नैमिषारण्य, काशी, उज्जैन, रामेश्वर, सन्नती अशा ऐतिहासिक सत्संग मेळाव्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मेळाव्यातून मानवी जीवन, सुखी, समाधानी, समृद्ध व्हावे तसेच राष्ट्राची प्रगती व्हावी या हेतूने लक्षचंडी, कोटीचंडी अशा ऐतिहासिक सेवा यशस्वीपणे पूर्ण करून आता अब्ज चंडीकडे वाटचाल सुरू आहे.

श्री  वज्रेश्वरी मातेचा उल्लेख हा नवनाथ भक्तिसार ग्रंथातील ७ व्या अध्यायात आढळतो. त्यातील संदर्भानुसार सप्तशृंगी मातेने गोरक्षनाथांना आणि नवनाथांना दिलेल्या वचनानुसार वज्रेश्वरी हा अवतार धारण केला आहे. महाराष्ट्रातील हे पवित्र आणि धार्मिक स्थान असून हे शक्तीपीठ चारही बाजूंनी डोंगराने वेढलेले आहे. तिथे असलेल्या गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांपैकी एक महत्त्वाचे स्थळ आहे. या वज्रेश्वरी स्थानास ऐतिहासिक संदर्भ असून माता वज्रेश्वरी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. वज्रेश्वरी हे पार्वतीचे रूप मानले जाते. ची प्रसिद्ध आख्यायिका अशी- कालिकत, दंतुर आणि दुर्दन नावाच्या तीन दैत्यांचे होणारे अत्याचार थांबवण्यासाठी वसिष्ठ ऋर्षीनी त्रिचण्डी नावाचा यज्ञ केला होता. प्रत्येक देवतेचा उच्चार करून हवनाची आहुती देत असताना नकळतपणे देवराज इंद्राचे नाव घेतले गेले नाही म्हणून देवराज इंद्राला क्रोध येऊन त्यांनी युद्ध पुकारून वज्र नावाचे आयुध वसिष्ठ ऋर्षीवर प्रहार करण्यासाठी सोडले. वज्र प्रहारामुळे पृथ्वीवर होणारा विनाश टाळला जावा या हेतूने देवांच्या विनंतीवरून माता पार्वतीने ते वज्र आपल्या उदरात घेतले आणि हे युद्ध थांबविले.

पुढे आई भगवतीने कालिकत, दंतुर आणि दुर्दन या तिन्ही दैत्यांचा वध केला आणि भगवान श्रीरामांच्या आग्रहामुळे आदिमाया शक्ती या ठिकाणी भक्तांच्या रक्षणासाठी सदैव उभी राहून आजही भक्तांचा उद्धार करीत आहे.

या मंदिरापासून २ किलोमीटर अंतरावर गणेशपुरी नावाचे पीठ असून तिथेही आरोग्यवर्धक गरम पाण्याचे कुंड असून त्या पाण्याने स्नान करणाऱ्या व्यक्तीचे विविध आजार नष्ट होतात अशी मान्यता आहे.

।। परमपूज्य गुरुमाऊली ।। परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशाने व आशीर्वादाने सकल सेवेकरी परिवार श्री वजेश्वरीच्या पवित्र शक्तीपीठावर आई भगवतीच्या श्री दुर्गासप्तशती पाठाची व श्रीचक्रराज श्री यंत्राची सेवा रुजू करणार आहेत.परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार असून त्यांच्या अमृततुल्य हितगुजाचा लाभ उपस्थितांना लाभणार आहे. तरी या राष्ट्रीय महासत्संग सोहळ्यास उपस्थित राहून आपले जीवन कृतकृत्य करावे, असे आवाहन सेवेकरी शंकर बने , संतोष राऊळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

संबंधित लेख

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.

मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती  मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...

मंगळवारी  वज्रेश्वरी येथे सत्संग मेळाव्याचे आयोजन.

वज्रेश्वरी :  श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा आयोजन समिती मुंबई च्या वतीने मंगळवार, दि. १८ मार्च २०२५  श्री क्षेत्र वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि.ठाणे...

महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले 

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला, यावेळी महिलांनी कायद्याचा दुरुपयोग करू नये, योग्य वेळी कायद्याचा वापर...