ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
नालासोपाऱ्याच्या संस्कार वाचनालयात मराठी गौरव दिन साजरा
आताच शेयर करा
Mar 5, 2025

 नालासोपारा : ( चंदू धुरी )  ७१ वर्षं संस्कार वाचनालयाला पुर्ण झाली. वाचनाची आवड निर्माण व्हावी. लायब्ररीत येऊन पुस्तक वाचावी. असा प्रयत्न सतत वाचनालय करत असते याशिवाय मंडळामार्फत आरोग्य शिबिर, मोबाईल मधून बाहेर पडून शरीर तंदुरुस्त रहावे यासाठी वेगवेगळे क्रीडा प्रकार राबवले जातात. संस्कार वाचनालयात ग्रंथसंपदा मोठ्याप्रमाणात उपलब्ध आहे.असे विचार मंडळाचे अध्यक्ष भूषण वाळिंजकर यांनी प्रास्ताविकातून मांडले.

         प्रतिभावंत कवी सिद्धहस्त नाटककार कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त समाज उन्नती मंडळ संचालित संस्कार वाचनालयाच्या वतीने कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन व निमंत्रितांचे कविसंमेलन नालासोपारा येथिल वाचनालयातच्या सभागृहात आयोजित केले होते.

       डहाणूचा हर्षित चुरी या नव्या दमाच्या कविने शिवरायांचा छावा ही कविता सादर केली. शिवाजी चा पुर्ण इतिहास त्यात मांडण्याचा प्रयत्न केला होता. डॉ. सुरेखा धनावडे यांनी आईपण हरवल्याची खंत व्यक्त केली तर राजीव गांधी विद्यालयाच्या सीमा पाटील यांनी काहीतरी राहून गेलंय सांगायचं. खूप काही बोलायच होत अशी वास्तववादी कविता सादर केली. वसई ची शान जेष्ठ साहित्यिक कवयित्री डॉ. पल्लवी बनसोडे यांनी संध्याकाळ ची वेळ असल्याने नील आकाशी चाॅद शराबी ही कवितेला उस्फुर्त प्रतिसाद दिला तर  विक्रांत केसरकर यांना रसिकांकडून मालवणी फरमाईश आली मालवणी भाव खाऊन गेला तर मधुकर तराळे यांनी मराठी भाषा रुजली पाहिजे तसेच वर्हाडी बोलीभाषेतील कविता सादर केली प्रत्येकी दोन कविता सादर करण्यात आल्या. पालघरचे साहित्यिक सुरेश पंडित, सुरेश घरत, सुमेधा वाळिंजकर यांनीही कविता सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली .जयश्री वाळिंजकर यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेचे वाचन केले.सर्व कविंचा सन्मान करण्यात आला.

      कार्यक्रमाचे नीटनेटके सूत्रसंचालन कवयित्री सौ. सुरेखा कुरकुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध लेखिका प्रवास वर्णनकार  डॉ. मीना प्रभू यांना श्रध्दांजली वाहिली . त्यानंतर सरस्वती पूजन करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचु सुरूवात झाली ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती सांगत त्यांच्या कणा कवितेला भरभरून दाद मिळाली कवि प्रल्हाद चेंदणकर, गुलजार, सुखदेव ढाणके शांताबाईचा संदर्भ देत कार्यक्रमात रंगत भरली तर आभार नाट्यकर्मी शांताराम वाळिंजकर यांनी मानले       मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या यशस्वी कार्यक्रमासाठी संस्कार वाचनालयाचे अध्यक्ष भूषण वाळिंजकर, उपाध्यक्ष रविन्द्र वाळींजकर, सहसचिव निलेश वाळिंजकर, सदस्य देवेंद्र वाळींजकर, दिप्ती वाळींजकर, विद्या वाळिंजकर ग्रंथपाल सुरेखा जाधव यांनी मेहनत घेतली. शांताराम वाळिजकर यांनी आभार मानले.

संबंधित लेख

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.

मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती  मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...

मंगळवारी  वज्रेश्वरी येथे सत्संग मेळाव्याचे आयोजन.

वज्रेश्वरी :  श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा आयोजन समिती मुंबई च्या वतीने मंगळवार, दि. १८ मार्च २०२५  श्री क्षेत्र वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि.ठाणे...

महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले 

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला, यावेळी महिलांनी कायद्याचा दुरुपयोग करू नये, योग्य वेळी कायद्याचा वापर...