ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले 
आताच शेयर करा
Mar 8, 2025

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला, यावेळी महिलांनी कायद्याचा दुरुपयोग करू नये, योग्य वेळी कायद्याचा वापर करावा असे मत अनेक वक्त्यांनी विशद केले. यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. स्नेहा माळवी यांनी रेखाटलेल्या महिला दिनाच्या रांगोळीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. 

महिला एक शक्ती आहे महिलाही दुर्गेच प्रतीक आहे महिलांमध्ये कुठलीही कमतरता नसते त्याची जाणीव होण्याची गरज आहे.त्याची जाणीव होण्याची गरज आहे .जाणीव करून पुढे जाण्याची गरज आहे. महिला सृजनशील असतात निर्मिती क्षम असतात महिलांमध्ये प्रचंड मोठ्या कॉलिटीज असतात त्या ओळखण्याची गरज आहे आपण ठरवलं तर सर्व गोष्टी होऊ शकतात आपण ठरवलं तर समाज बदलू शकतो तर महिलांनी ठरवण्याची गरज आहे स्वतःला ओळखण्याची गरज आहे आयुष्य आणि जगण्याची गरज आहे असं मत मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले श्रींगी यांनी व्यक्त केले.

महिलांचे मनोधैर्य व स्त्रीत्वाच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाची कवाडे खुली करत लाखो स्त्रियांना नवे क्षितीज दाखवले आणि नवी पहाट उगवली. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये सर्वांचा सहभाग मिळावा व त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून “जागतिक महिला दिन” साजरा केला जातो. महिलांप्रती जिव्हाळा व आदर व्यक्त करुन त्यांचा सन्मान करुन समाजप्रबोधन घडविण्याच्या दृष्टीने सदर दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन वसई-विरार शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात आले होते.

 पोलिस उप आयुक्त पौर्णिमा चौगुले, महिला साहित्यिका  वीणा गवाणकर,  पल्लवी बनसोडे, वकील क्षेत्रातील अँड. मनिषा पाटील, उत्कर्षा दरवेशी, महिला पत्रकार वैष्णवी राऊत, क्रिडा क्षेत्रातील दिव्यांग खेळाडू निशा जरिवाला, कोमल भूषण पाटील, सिमा बंन्शिलाल वर्मा, क्रिडा क्षेत्रातील महिला खेळाडू समिधा अनंत चव्हाण, कामाक्षा प्रशांत ढेपे, सरिता शिवाजी बजबळकर, सुषमा जगदीश पाटील, संध्या अजय भुमकर, जिज्ञा सुजित राऊत, वृषाली प्रभाकर पाटील, अॅडेले रॉयल परेरा, महिला रिक्षा चालीका  दर्शना दिनेश थालकर, प्रमिला ओरस्कर, महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील परिचारीका मनिषा कोटकर, मिनल पाटील,  नयना पाखरे, महानगरपालिकेच्या सफाई कामगार  सुनंदा घरत, रुक्मिणी आनंद गोहिल, शांता ईश्वर सोलंकी व बस कंडक्टर  हर्षला सुर्यभान यांचा कर्तृत्ववान महिला म्हणून सन्मान  आयुक्त अनिलकुमार पवार (भा.प्र.से) यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच महानगरपालिकेतील महिला  कर्मचाऱ्यांना  अॅड. मनिषा पाटील यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त  समीर भूमकर, उपायुक्त  अर्चना दिवे, उपायुक्त नानासाहेब कामठे, उपायुक्त श्री. सुभाष जाधव व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल, महिलांकरीता आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम व “खेळ पैठणीचा अर्थात होममिनिस्टर इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कार्यालयातील महिला कर्मचारी यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.नालासोपारा : ( विजय देसाई) वसई विरार महानगरपालिकेने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला, यावेळी महिलांनी कायद्याचा दुरुपयोग करू नये, योग्य वेळी कायद्याचा वापर करावा असे मत अनेक वक्त्यांनी विशद केले. यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. स्नेहा माळवी यांनी रेखाटलेल्या महिला दिनाच्या रांगोळीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. 

महिला एक शक्ती आहे महिलाही दुर्गेच प्रतीक आहे महिलांमध्ये कुठलीही कमतरता नसते त्याची जाणीव होण्याची गरज आहे.त्याची जाणीव होण्याची गरज आहे .जाणीव करून पुढे जाण्याची गरज आहे. महिला सृजनशील असतात निर्मिती क्षम असतात महिलांमध्ये प्रचंड मोठ्या कॉलिटीज असतात त्या ओळखण्याची गरज आहे आपण ठरवलं तर सर्व गोष्टी होऊ शकतात आपण ठरवलं तर समाज बदलू शकतो तर महिलांनी ठरवण्याची गरज आहे स्वतःला ओळखण्याची गरज आहे आयुष्य आणि जगण्याची गरज आहे असं मत मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले श्रींगी यांनी व्यक्त केले.

महिलांचे मनोधैर्य व स्त्रीत्वाच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाची कवाडे खुली करत लाखो स्त्रियांना नवे क्षितीज दाखवले आणि नवी पहाट उगवली. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये सर्वांचा सहभाग मिळावा व त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून “जागतिक महिला दिन” साजरा केला जातो. महिलांप्रती जिव्हाळा व आदर व्यक्त करुन त्यांचा सन्मान करुन समाजप्रबोधन घडविण्याच्या दृष्टीने सदर दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन वसई-विरार शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात आले होते.

 पोलिस उप आयुक्त पौर्णिमा चौगुले, महिला साहित्यिका  वीणा गवाणकर,  पल्लवी बनसोडे, वकील क्षेत्रातील अँड. मनिषा पाटील, उत्कर्षा दरवेशी, महिला पत्रकार वैष्णवी राऊत, क्रिडा क्षेत्रातील दिव्यांग खेळाडू निशा जरिवाला, कोमल भूषण पाटील, सिमा बंन्शिलाल वर्मा, क्रिडा क्षेत्रातील महिला खेळाडू समिधा अनंत चव्हाण, कामाक्षा प्रशांत ढेपे, सरिता शिवाजी बजबळकर, सुषमा जगदीश पाटील, संध्या अजय भुमकर, जिज्ञा सुजित राऊत, वृषाली प्रभाकर पाटील, अॅडेले रॉयल परेरा, महिला रिक्षा चालीका  दर्शना दिनेश थालकर, प्रमिला ओरस्कर, महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील परिचारीका मनिषा कोटकर, मिनल पाटील,  नयना पाखरे, महानगरपालिकेच्या सफाई कामगार  सुनंदा घरत, रुक्मिणी आनंद गोहिल, शांता ईश्वर सोलंकी व बस कंडक्टर  हर्षला सुर्यभान यांचा कर्तृत्ववान महिला म्हणून सन्मान  आयुक्त अनिलकुमार पवार (भा.प्र.से) यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच महानगरपालिकेतील महिला  कर्मचाऱ्यांना  अॅड. मनिषा पाटील यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त  समीर भूमकर, उपायुक्त  अर्चना दिवे, उपायुक्त नानासाहेब कामठे, उपायुक्त श्री. सुभाष जाधव व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल, महिलांकरीता आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम व “खेळ पैठणीचा अर्थात होममिनिस्टर इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कार्यालयातील महिला कर्मचारी यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.

संबंधित लेख

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.

मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती  मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...

मंगळवारी  वज्रेश्वरी येथे सत्संग मेळाव्याचे आयोजन.

वज्रेश्वरी :  श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा आयोजन समिती मुंबई च्या वतीने मंगळवार, दि. १८ मार्च २०२५  श्री क्षेत्र वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि.ठाणे...

महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले 

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला, यावेळी महिलांनी कायद्याचा दुरुपयोग करू नये, योग्य वेळी कायद्याचा वापर...