ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
स्वारगेट प्रकरणानंतर 
आताच शेयर करा
Mar 8, 2025

नालासोपारा एस.टी. आगाराची शिवसेने  कडुन पाहणी .

नालासोपारा : स्वारगेट येथील बस स्थानक येथे घडलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर इतर कोणत्याही बस स्थानकामध्ये महिलांवर गैरकृत्य होवू नये म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सुचनेनुसार व जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य परिवहन आगार भेटीसाठी सर्वेक्षण फॉर्म सोबत घेवून शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख रूचिता नाईक व शहरप्रमुख आनंद नगरकर , राजेंद्र रांजणे यांनी नालासोपारा आगाराच्या दुर्दशेबाबत जाब विचारत चांगलेच फैलावर घेतले.

नालासोपारा एस टी स्थानक कमी एका विशिष्ट पक्षाचे स्थानक सर्व ठिकाणी दिसून येत असल्याने निदर्शनास आले.

तसेच वाहतुक पोलीसांनी हजारो  जमा केलेली वाहने हि आगारात पडुन असल्याने त्याठिकाणी अडचण निर्माण होत आहे.

 शासनाच्या आदेशानुसार एस.टी. स्टॅण्डवर असलेल्या महिलांच्या बेस्ट शौचालयामध्ये सॅनिटरी पॅड मशिन व इतर सुविधा दिसून आल्या नाहीत त्याचप्रमाणे स्तनदा महिलांसाठी हिरकणी कक्ष  आहे पण  कोणत्याही सुविधा नाहीत तसेच हिरकणी कक्ष   शिवसेनेचे पदाधिकारी आल्यामुळेच तो उघडा ठेवला होता इतर वेळी तो कक्ष बंद अवस्थेत असतो अशी तक्रारही यावेळी प्रवाशांनी शिवसेनेच्या महिला आघाडीकडे केली.

त्याचप्रमाणे विकलांग प्रवाशांसाठी सुलभ प्रवेश, रॅम्प, रेलिंग व प्रतीक्षा  विश्रामाची योग्य सुविधा आगार प्रमुखांनी करून घेणे आवश्यक असताना ही या ठिकाणी विकलांगासाठी कोणतीही सुविधा पहायला मिळाली नाही तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभावही दिसून आला.

यावेळी महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी महिला अधिकारी  कर्मचाऱ्यांसाठी विशाखा समितीची स्थापना केली आहे का ? याबाबत विचारणा केली असता सदरची समिती सुध्दा फक्त कागदावरच तयार करण्यात आलेली असून प्रत्यक्षात तसा फलक कोठेही लावण्यात आलेला नाही. नालासोपारा आगाराच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर दिसून आला तर महिलांच्या शौचालयामागे घाणीचे साम्राज्य दिसून आल्याने आगार व्यवस्थापकांकडे विचारणा करताच त्यांनी महानगरपालिकेची घंटागाडी येत नसल्याचे व एस.टी.डेपोच्या बाहेर अतिक्रमण होत असून महानगरपालिका लक्ष देत नसल्याचे कारण सांगत महानगरपालिकेस जबाबदार धरले.

यापूर्वी शिवसेनेच्या महिला शहर प्रमुख रूचिता नाईक  यांनी महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी व वाढत्या चोऱ्यांना चाप बसावा म्हणून प्रवाशांच्या बैठक आसनाच्या मध्यभागी पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन केलेला होता तो कक्षही सध्या त्या ठिकाणी नसल्याने पदाधिकाऱ्यांचा पारा अनावर झाला.

यावेळी शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी सांगितले की, शिवसेनेच्या राज्य परिवहन आगार भेटीसाठी सर्व्हेक्षण फॉर्ममध्ये नालासोपारा आगाराची संपूर्ण माहिती भरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना कळविणार असून लवकरात लवकर सर्व सुविधा आगार व्यवस्थापकांच्या वतीने या ठिकाणी करण्यात याव्यात अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

संबंधित लेख

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.

मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती  मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...

मंगळवारी  वज्रेश्वरी येथे सत्संग मेळाव्याचे आयोजन.

वज्रेश्वरी :  श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा आयोजन समिती मुंबई च्या वतीने मंगळवार, दि. १८ मार्च २०२५  श्री क्षेत्र वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि.ठाणे...

महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले 

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला, यावेळी महिलांनी कायद्याचा दुरुपयोग करू नये, योग्य वेळी कायद्याचा वापर...