१२ वर्षापूर्वी १६५.२९ लाखांचं धरण झाल असत साधारण ३ हजार कोटी वाचले असते.
धरण बांधण्यासाठी अनेक जागा उपलब्ध.
इतर महापालिकेंना पाणी देण्यास आमचा विरोध नाही मात्र इतरांना दुसरे धरण बांधून द्यावे. माजी आमदार हितेंद्र ठाकूर
वसई विरार जगातील एक नंबर शहर.
आम्ही तुमच्या ताटात वाढून ठेवलंय ते खराब नका करू ,ते लोकांच्या पोटात जाऊद्या

वसई : देहेरजे प्रकल्पाच पाणी पेटणार,पाण्याच्या प्रत्येक थेंबा…थेंबा वर आमचा हक्क..
१२ वर्षापूर्वी १६५.२९ लाखांचं धरण झाल असत साधारण ३ हजार कोटी वाचले असते.
धरण बांधण्यासाठी अनेक जागा उपलब्ध.
इतर महापालिकेंना पाणी देण्यास आमचा विरोध नाही मात्र इतरांना दुसरे धरण बांधून द्यावे. माजी आमदार हितेंद्र ठाकूर
वसई विरार जगातील एक नंबर शहर.
आम्ही तुमच्या ताटात वाढून ठेवलंय ते खराब नका करू ,ते लोकांच्या पोटात जाऊद्या
नालासोपारा : ( विजय देसाई ) देहेरजे प्रकल्पावरून वसई विरार चे राजकारण तापले असून धरण बनण्याआधी पाणी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पाण्याच श्रेय घेण्यासाठी भाजप आणि बहुजन विकास आघाडी मध्ये जुंपणार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देहरजे प्रकल्पासाठी वसई विरार महानगरपालिकेने दीडशे कोटी भरले होते त्यामुळे या पाण्यावर वसई विरारचाच हक्क असल्याचं माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ठासून सांगितले. ठाकूर यांनी आम्ही तुमच्या ताटात वाढून ठेवलंय ते खराब नका करू ,ते लोकांच्या पोटात जाऊद्या असा सल्ला भाजपाचे नाव न घेता दिला आहे. वसई विरार चे राजकारण नेहमी पाण्याभोवती फिरत राहिले. पाण्याचा देहरजे प्रकल्प वेळेत झाला असता तर कोट्यावधी रुपये वाचले असते असा गौप्यस्फोट हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
गेली तीन दशके वसई विरार वर एक हाती सत्ता बहुजन विकास आघाडी पक्षाची होती.पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला. या परिसरातील पाणीकारणात या पक्षाची महत्वाची भुमिका होती. त्यांनी काही प्रमाणात पाण्याची सोय केली असली तरी ती पुरेशी नसल्याने नागरिकांची सतत ओरड राहत होती. म्हणूनच या भागासाठी स्वतंत्र प्रकल्प राबविण्याची मागणी होती. त्याला 11 तारखेला मंगळवारी मान्यता देण्यात आली.
देहेरजे मध्यम प्रकल्प घटनाक्रम
बहुजन विकास आघाडीने केलेला पाठपुरावा.
दि. १९/०४/२०१२
महापौर, वसई-विरार शहर महानगरपालिका यांचे मा. मंत्री जलसंपदा यांना देहेरजी घरण पिण्याच्या पाण्याकरीता महापालिकेस आरक्षीत करण्याकरीता मागणी पत्र.
दि.०३/०६/२०१३
महापौर, वसई-विरार शहर महानगरपालिका यांची देहेरजे धरण आरक्षीत करण्याची मागणी.
दि.२५/०९/२०१३
मा. उपमुख्यमंत्री यांच्या दालनात झालेलील्या बैठकीत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अर्थसहायाने सदर प्रकल्प पूर्णठेव तत्वावर ऐवजी पा.पु. प्रकल्प असा बदल करण्याचे निर्देश (अजित दादा पवार)
दि. २२/११/२०१३ अधिक्षक अभियंता झगडे यांच्याकडे , उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ ठाणे यांचों NPV भरणा करण्यासाठी रु.१५० कोटी वर्ग करण्याची मागणी.
१९/१२/२०१३
कोंकण पाटबंधारे विकास महामंडळामार्फत पूर्ण ठेव तत्वावर देहेरजी मध्यम प्रकल्प उभारणेकामास महापालिकेची प्रशासकीय मान्यता
दि. १८/०२/२०१४ :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत महापालिकेने प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास प्रकल्पातून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येईल अशा सूचना दिल्या.
दि. २५/०२/२०१४
कार्यकारी अभियंता, रायगड पाटबंधारे विभाग क्र.२. कोंकण भवन, नवि मुंबई यांचे प्रकल्पाकरीता रु.२०० कोटी वर्ग करण्याची मागणी.
दि. २५/०२/२०१४
जलसंपदा विभागाकडे NPV भरणा करणेकरीता रु.१५० कोटी वर्ग.
दि.०४/०३/२०१४
देहेरजी मध्यम प्रकल्पातून ६९.४२ द.ल.घ.मी. (म्हणजेच १९० द.ल.ली.) पाणी वसई-विरार शहर महानगरपालिकेसाठी आरक्षीत करणेबाबत शासन निर्णय.
दि.०६/०६/२०१४
मा. उपमुख्यमंत्री यांच्याकडे देहेरजी धरणातील संपूर्ण पाणीसाठा महापालिकेसाठी आरक्षीत करण्याची आमदार श्री. क्षीतीज ठाकूर यांची मागणी
दि. १८/०६/२०१४
मा. उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न, बैठकीत देहेरजी घरण मा. उपमुख्यमंत्री य महानगरपालिकेस पिण्याच्या पाण्याकरीता आरक्षीत करण्याचे निर्देश
२१/०८/२०१४
घरणाच्या प्रस्तावास केंद्र शासनाच्या पर्यावरण वन मंत्रालयाची तत्वतः मान्यता,
दि.१५/०१/२०१५
सहाय्यक मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग को.प्र. मुंबई यांची NPV करीता रु. १५. २९ कोटी निधीची मागणी.
दि.०३/०२/२०१५
रु. १५.२९ कोटी निधी जलसंपदा विभागाकडे महापालिकेने वर्ग केला.
दि. १९/०२/२०१६:
केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाची प्रकल्पाच्या प्रस्तावास अंतिम मान्यता.
दि.०४/१२/२०१७ : रु.१०६९ कोटीचे सुधारीत अंदाजपत्रक जलसंपदा विभागामार्फत महापालिकेस पाठविण्यात आले.
दि. १४/११/२०१८ : मा. मंत्री (जलसंपदा) गिरीश महाजन यांच्या अधक्षतेखाली झालेल्या बैठकीत रु. ६५० कोटी वरून रु.१२०० कोटी पर्यंत झालेल्या प्रकल्प खर्चातील वाढीमुळे महापालिकेने अर्थसहाय्य करण्यास नकार दिला मात्र पाणी आरक्षण कायम ठेवण्याची विनंती केली. त्यावेळी MMRDA आयुक्त यांनी त्यांच्या अर्थ सहाय्यातून प्रकल्प हाती घेण्यास सहमती दर्शविली.
दि.११/०९/२०१९
देहेरजी मध्यम प्रकल्प MMRDA च्या अर्थसहाय्यातून राबविण्याबाबत शासन निर्णय
दि.१४/०९/२०२१
रु.१४४३.७२ कोटी खर्चाच्या सुधारीत अंजपत्रकास शासनाने सुधारीत प्रशासकीय मन्यिता दिली.
दि.२०/१०/२०२२
MMRDA ची १५३ व्या बैठकीत पाणी आरक्षणात बदलाचा निर्णय.
दि. १९/१२/२०२३:
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची पत्राव्दारे आरक्षण कायम ठेवण्याबाबत मागणी.
दि. २२/०६/२०२४:
मा.उपमुख्यमंत्री यांचेकडे आमदार हितेंद्र ठाकूर यांची देहेरजी प्रकल्पातून पाणी आरक्षण कायम ठेवण्याकरीता बैठकीची मागणी. (देवेंद्र फडणवीस)
दि.०९/०७/२०२४:
मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्देश – MMRDA च्या १५३ व्या बैठकीत झालेल्या निर्णयामध्ये बदल करुन देहेरजे धरणातील पाणी वसई-विरार शहर महानगरपालिकेस आरक्षीत करण्याबाबत सुधारणा करण्याचे निर्देश,
दि.११/०२/२०२५
मंत्रीमंडळ बैठकीत रु.२५९९.१५ कोटी च्या सुधारीत खर्चास शासनाची मान्यता तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेस ६९.४२ द.ल.घ.मी. पाणी आरक्षण कायम ठेवण्यास मान्यता.
*कसा असेल हा प्रकल्प*
हा प्रकल्प देहरजी प्रकल्प असून ९५.६० मेट्रीक क्युबीक मिटर इतका मोठा असेल
या प्रकल्पाची किमंत २५९९ कोटी रूपये ठरविण्यात आली होती.
– त्यात ११५५ कोटी रूपये इतकी वाढीव तरतुदीला मंगळवारी मान्यता देण्यात आली होती.
– हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर तीन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे
– साडे तीन टीएमसी पाणी या प्रकल्पातून मिळणार आहेत. या प्रकल्पातून नागरिकांची पाण्यासाठी सोय होणार असली तरी त्यातून सत्ताधारी पक्षांचा राजकिय हेतू सुद्धा साध्य होणार आहे. हा प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील बविआची मक्तेदारी संपवून भाजपचा प्रभाव वाढण्यास मदत होणार आहे.