ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.
आताच शेयर करा
Apr 11, 2024

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही वर्षी विठ्ठल संस्थान विरार यांच्यातर्फे शोभायात्रा काढण्यात आली होती. प्रथम महापौर राजीव पाटील,आमदार राजेश पाटील, माजी स्थायी समिती अध्यक्ष पंकज ठाकूर  अजीव पाटील, किरण ठाकूर,  मनीष वैद्य, हार्दिक राऊत, डॉ. मंगला परब,मयुरेश वाघ यांच्यासह अनेक मान्यवर या शोभायात्रेसाठी उपस्थित होते.या यात्रेत बऱ्याच स्त्रियांनी मराठमोळा साज करून या शोभायात्रेला चार चांद लावले होते.  बाय पण भारी देवा म्हणत या स्त्रियांनी बाईक वरून रॅली काढली होती  या रॅलीमध्ये मतदानाची जनजागृती करण्यात आली होती. ढोल ताशाचा गजरात लहान मुलं व महिला थिरकत होत्या. या यात्रेमध्ये लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश धारण करून आपल्या  संस्कृतीशी नव्याने ओळख करून देण्याचा छोटे खाणी प्रयत्नही केला होता.राजकीय पादत्राणे बाहेर काढून  सर्व पक्षाचे जाती-धर्माचे लोक या शोभायात्रेत सहभागी झाले होते.विद्याविहार इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राम लल्ला यांची प्रतिकृती साकारली होती.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...