ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
“ननंद-भावजाई सन्मान सोहळा” ठरला अविस्मरणीय!
आताच शेयर करा
Oct 29, 2025

नालंदा माहेर वाशिम व आम्रपाली महिला मंडळ चोरवली यांचा उपक्रम महिलांच्या हृदयात जागा करून गेला 

नालासोपारा : वाशिम जिल्ह्यातील नालंदा माहेर व आम्रपाली महिला मंडळ चोरवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ननंद भावजाई सन्मान सोहळा” हा विशेष कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद कांता धर्मा जाधव (वर्षा तांबे) यांनी भूषवले.

गावाकडून लग्न होऊन वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या नणंदांना आपल्या गावाशी पुन्हा जोडण्याचा, तसेच नणंद-भावजयींमधील प्रेम व जिव्हाळा वाढवण्याचा हा आगळावेगळा प्रयत्न ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली, त्यानंतर सर्व मान्यवर व सहभागींचा सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कविता पुणेकर यांनी आपल्या सुरेल गायनाने वातावरण मंत्रमुग्ध केले.

अंधश्रद्धा निर्मूलन आणि विज्ञानाची जाणीव यासाठी वर्षा तांबे यांनी सादर केलेला मॅजिक शो प्रेक्षकांच्या टाळ्यांचा वर्षाव घेत गेला! 

विशेष अतिथी प्रिया लाड यांनी महिलांच्या मासिक पाळी स्वच्छता व आरोग्याविषयी मार्गदर्शन केले, तर सुप्रसिद्ध वक्ते संजय लाड यांनी हास्य-मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करून वातावरण रंगवले. विशेष म्हणजे “होम मिनिस्टर” या खेळात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला! 

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी अशीच उपक्रम महाराष्ट्रभर व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली.त्यावर वनस्पती शास्त्रज्ञ सौ. वर्षा तांबे यांनी विश्वास दिला  “अशा स्नेहमेळाव्यांतून महिलांचं बंधुभावाचं नातं मजबूत होतं, आणि आम्ही हे उपक्रम प्रत्येक जिल्हा-तालुक्यात घेऊन जाणार आहोत.” असे वर्षा तांबे यांनी सांगितले.

हा ‘ननंद-भावजाई सन्मान सोहळा’ ठरला केवळ सन्मान नव्हे, तर नात्यांच्या नव्या धाग्यांनी विणलेला सुंदर उत्सव! ननंद भावजय मध्ये जिव्हाळा निर्माण करणारा ठरला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचशील सेवा संघ मंडळ चोरवली  चे पदाधिकारी पांडुरंग धर्मा जाधव ,नरेश दगडू जाधव,विशाल विठ्ठल जाधव ,एकनाथ धोंडूराम जाधव 

जावई बापू विठ्ठल गोविंद जाधव, राज फुल तुकाराम तांबे विजेंद्र राजू येलवे,विशाल लक्ष्मण मोहिते, अरुणा परशुराम जाधव पवार ,रोशनी जयराम जाधव साळवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

संबंधित लेख

सधवा-विधवा भेद विसरून महिला सन्मानाचा भव्य हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न.”

भिवंडी : श्रमजीवी संघटनेच्या वतीने भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती दुगाड फाटा भिवंडी येथे आज शनिवार दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात...

“ननंद-भावजाई सन्मान सोहळा” ठरला अविस्मरणीय!

नालंदा माहेर वाशिम व आम्रपाली महिला मंडळ चोरवली यांचा उपक्रम महिलांच्या हृदयात जागा करून गेला  नालासोपारा : वाशिम जिल्ह्यातील नालंदा माहेर व...

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.

मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती  मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...