ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
वैद्यकीय विजा घेऊन विदेशी महिलेची ड्रग्सची तस्करी , विदेशी महिलेसह रिक्षा चालकाला अटक.सापळा लावण्यासाठी पोलीस बनले रिक्षाचालक ,फळ विक्रेता.
आताच शेयर करा
Mar 5, 2025

नालासोपारा : ( स्नेहा विश्वकर्मा ) नालासोपाऱ्यात वैद्यकीय विजा घेऊन मॅफेड्रॉन ड्रग्स तस्करी करणाऱ्या विदेशी महिलेला नार्कोटिक्स शाखेच्या पथकाने विदेशी महिलेसह एका रिक्षा चालकास अटक करून त्यांच्याकडून सुमारे एक कोटीहून जास्त किमतीचा ट्रक्स जप्त केला आहे पुढील तपास नालासोपारा पोलीस करत आहेत.

नायजेरियन महिला वैद्यकीय तपासणीसाठी विजा वर येऊन नालासोपाऱ्यातील प्रगती नगर येथे राहत होती. मात्र तिचा विजा संपल्यानंतर सुद्धा ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विदेशी महिला नागरीक व तिचा रिक्षाचालक साथीदार यांचेकडुन ५२०.८ ग्रॅम वजनाचा १,०४,१६,००० रु. किंमतीचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करुन कारवाई ” “अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा यांनी कारवाई केली आहे.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वरिष्ठांनी अंमली पदार्थ खरेदी विक्री करणारे ईसमांचा शोध घेवून त्यांचेकडे काही आक्षेपार्ह चिजवस्तु मिळून आल्यास कायदेशीर कारवाई करणेबाबत वरिष्ठांनी तोंडी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि. २२.०२.२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन कांबळे, पोउनि संतोष घाडगे व पोलीस पथक परिमंडळ-२ परीसरात रवाना झाले होते.

गस्ती दरम्यान वाघेश्वर बालाजी हनुमान मंदिरा समोर रोडवर, नालासोपारा (पूर्व) या ठिकाणी या ठिकाणी एक दक्षिण आफ्रिका वंशाची महिला नागरीक सध्या रा.प्रगती नगर, नालासोपारा (पूर्व) व तिचा साथीदार रिक्षाचालक पुरुष ईसम रा. नालासोपारा (पूर्व) हे संशयास्पद स्थितीत मिळून आल्याने त्यांची पंचांसमक्ष झडती घेतली असता विदेशी नागरीक महिला नायजेरीयन नागरीक तिची अंगझडती घेतले असता तिच्याकडे  एकुण ५०६.२ ग्रॅम वजनाचा १,०१,२४,००० रु. किंमतीचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ व्यावसायीक प्रमाणात विक्रीकरीता बाळगला असताना मिळून आले तसेच रिक्षाचालक ईसम याचे कब्ज्यात १४.६ ग्रॅम वजनाचा २,९२,००० रु. किमतीचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीकरीता स्वतःचे कब्ज्यात बाळगला असताना मिळुन आला असून एकूण ५२०.८ ग्रॅम वजनाचा १,०४,१६,०००रु. किंमतीचा अंमली पदार्थ पंचनाम्याव्दारे जप्त करण्यात आला आहे. नमुद विदेशी नायजेरीयन महिला व रिक्षाचालक ईसमांविरुध्द नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र. ॥ ६०/२५ एन.डी. पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८(क), २२ (क), २९ सह विदेशी नागरीक अधिनियम १९४६ चे कलम १४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत चालु आहे.

सदरची कारवाई अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. मदन बल्लाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोनि. सचिन कांबळे, पोउनि. संतोष घाडगे, पोहवा.  पी.डी.पाटील, पोहवा. एस.ए. आव्हाड, पोहया. एस.एस.घेरे, पोहवा. पी.डी. टक्के, पोहवा. एम.पी. पागधरे, पोहवा. व्ही.ए.आवळे, पोहचा.  ए.बी.यादव, मपोहवा. लतादेवी एक्कलदेवी व चालक पोहवा. डी.एस. इंगळे यांनी केली आहे.

संबंधित लेख

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.

मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती  मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...

मंगळवारी  वज्रेश्वरी येथे सत्संग मेळाव्याचे आयोजन.

वज्रेश्वरी :  श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा आयोजन समिती मुंबई च्या वतीने मंगळवार, दि. १८ मार्च २०२५  श्री क्षेत्र वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि.ठाणे...

महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले 

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला, यावेळी महिलांनी कायद्याचा दुरुपयोग करू नये, योग्य वेळी कायद्याचा वापर...