विरार : कोरोना च्या महामारीत जगाची आर्थिक घडी विस्कटली असताना, तसेच अनेक बँका शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज देण्यास राजी नसताना मात्र ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके शेतकऱ्यांबाबत आपुलकी जपत त्यांना “बँक शेतकऱ्यांच्या बांधावर” असा अनोखा उपक्रम बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व त्यांच्या संचालक मंडळाने केला आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे कोटी नाही तर चारशे कोटी द्यावे लागले तर द्या अशा सूचना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांना यांच्या शेतकऱ्यांना शेत बांधावरच कर्ज वाटप संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमांवेळी आमदार ,राजेश पाटील , माजी खासदार बळीराम जाधव,जिल्हा डी डी आर दिगंबर हौसारे,मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र दोंदे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी भरत जाखडी ,उप निबंधक योगेश देसाई ,शाखा प्रबंधक राजेश मस्तान ,राहुल जाधव,भालचंद्र पाटील,प्रकाश राठोड यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते .सदर वाटप हे उसगाव , मेढे येथे २५ शेतकऱ्यांना प्रारंभिक स्वरूपात करण्यात आले. सद्ध्या कोरोना या महामारीच्या काळात शेतकऱ्यांना बँकेत येण्यापेक्षा बँकच शेतकऱ्यांच्या दारी गेली तर त्यांना मोठे सहाय्य्य लाभेल या विचारधारेतून हि संकल्पना राबवण्यात येत आहे . बँकेने ठाणे व पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांना २०० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्धिष्ठ ठेले असून आता पर्यंत ७० कोटी वाटप दोन्ही जिल्हे मिळून असलेल्या सेवा सोसायट्यांच्या माध्यम केल्याचे पाटील यांनी सांगितले.
“ननंद-भावजाई सन्मान सोहळा” ठरला अविस्मरणीय!
नालंदा माहेर वाशिम व आम्रपाली महिला मंडळ चोरवली यांचा उपक्रम महिलांच्या हृदयात जागा करून गेला नालासोपारा : वाशिम जिल्ह्यातील नालंदा माहेर व...









