ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
रानगाव ग्रामपंचायत, आशा वरकर्स व प्राथमीक आरोग्यकेंद्रास कोरोनाशी लढण्यासाठी भाजपा वसई रोड मंडळाची भरघोस मदत.
आताच शेयर करा
Jun 17, 2020

नालासोपारा : वसईतील रानगाव ग्रामपंचायतीस भाजपा वसई रोड मंडळाकडून मास्क, आर्सेनिक अलब्म गोळ्या, फेस शिल्ड रानगाव ग्रामपंचायतच्या सरपंच यांच्याकडे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या विशेष उपस्थित सुपूर्त करण्यात आल्या.तसेच कोरोना काळात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या आशा वरकर्स जीवनावश्यक वस्तूंचे किट, एक चादर व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे केरळ आर्यवैद्य कंपनीचे आयुर्वेदिक औषध “निंबार्क”, फेस शिल्ड आदींची मदत करण्यात आली. वसईतील अनेक गावांची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या वसई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी वर्गासाठी केंद्राचे प्रमुख डॉ. महाले यांच्याकडे पीपीईकिट सुपूर्त करण्यात आली.

भाजपा वसई रोड मंडळाकडून कोरोनाकाळात मागील दोन अडीच महिन्यांपासून पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या माध्यमातून यथाशक्ती मदत करण्याचे कार्य चालू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज ही मदत करण्यात आली. असे मंडळ अध्यक्ष उत्तम कुमार यांनी यावेळी सांगितले.

विशेष उपस्थित भाजपा वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी भाजपा वसई रोड मंडळाकडून चालू असलेल्या कार्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.

रानगावच्या सरपंच वैशाली घरत, उपसरपंच जितेंद्र मेहेर,  पंचायत सदस्य देवदास मेहेर व स्थानिक भाजपा पदाधिकारी अमर मेहेर, संजय घरत, ग्रामसेवक संजय किनी यांनी भाजपा वसई रोड मंडळाचे आभार मानले. यावेळी नालासोपारा जिल्हा सरचिटणीस मनोज बारोट, जिल्हा सरचिटणीस हरेंद्र पाटील, वसई रोड मंडळ उपाध्यक्ष रमेश पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...