नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील दुबे इस्टेट परिसरातील रेल्वे कंपाऊंड भिंतीलगत च्या वसई-विरार महानगरपालिकेच्या नाल्यावरील बंद अवस्थेतील २७ अनाधिकृत टपऱ्या जमीनदोस्त केल्या असून यामुळे वसई विरार कारांना रेल्वे स्टेशन वर जाताना मोकळा रस्ता मिळणार असून नालेसफाईचा अडथळा दूर झाला आहे.
वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयुक्त डी.गंगाथरन हे विराजमान झाल्या नंतर प्रशासनातील कामचोराना घरचा रस्ता दाखवला आहे. जे कर्मचारी सफाई कामगार असताना सफाई न करता प्रभाग समित्यांच्या कार्यालयात बसून पगार घेत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आल्या नंतर त्यांना कामाला लावले. सध्या ते वसई विरारचे सिंघम म्हणून ओळखले जावू लागले आहे.
नालासोपारा पूर्वेकडील दुबे इस्टेट परिसरातील गटारावर अनेकांनी अनाधिकृत टपऱ्या बांधून आपले बस्तान बसवले होते त्यामुळे नाले सफाई करताना सफाई कर्मचाऱ्यांना नाल्यांची साफसफाई करताना आणि रेल्वे प्रवाशांना प्रवास करताना मोठा अडथळा निर्माण होत होता पालिका आयुक्त डी गंगाथरन यांनी नालेसफाईचा आढावा घेत असताना ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ २७ अनधिकृत टपऱ्या तोडण्याचे आदेश प्रभारी सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे यांना दिले असता त्यांनी ही कारवाई केली आहे नगरपरिषद असल्यापासून या जागेवर अतिक्रमण केलं होतं त्यामुळे आजूबाजूचा परिसर पाण्याखाली जात होता तसेच रेल्वे प्रवाशांना चालणे मुश्कील झाले होते. मात्र या टपऱ्या हटवण्यात आल्याने नालेसफाईचा अडथळा दूर झालाच पण रेल्वे प्रवाशांना आता चालणे सोपे होणार आहे. या कारवाईमुळे नागरिकातून समाधान व्यक्त केले जात असून पालिका आयुक्त डी.गंगाथरन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान पालिका आयुक्त डी.गंगाथरन यांनी मला आपला शहर स्वच्छ करायचे आहे. त्यामुळे असे नालेसफाईत येणारे अडथळे दूर केले जाणार असून शहरात कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.