ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
पालघर जिल्हयात रोजगाराची संधी उपलब्ध,अर्ज भरण्याचे,डॉ कैलास शिंदे यांचे आवाहन.
आताच शेयर करा
Jun 12, 2020

पालघर : जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आप-आपल्या राज्यात  स्थलांतरीत      झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील कामगार आपल्या जिल्हयात परतलेला आहे. त्यामुळे पालघर जिल्हयातील तारापूर, पालघर, वसई, डहाणू व वाडा या आद्योगिक वसाहतींना अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करावा लागत आहे. तसेच इतर आस्थापनांमध्ये मोठया प्रमाणात रिक्तपदे निर्माण               झालेले आहेत. तरी जिल्हयातील बेरोजगारांना युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी संधी निर्माण झालेली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी सांगितले.

पालघर जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी न केलेल्या उमेदवारांनी Employment > Job Seeker Option निवडून नोंदणी करावी, तसेच पूढील लिंकवर क्लिक केल्यास नोंदणीचा फॉर्म उपलब्ध होईल https://bit.ly/3eWTy7U.  सदर नोंदणी ही विनामुल्य आहे. सर्व ग्रामपंचायतीमधील आपले सेवा केंद्रामार्फत सुद्धा नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी सांगितले..

    जिल्हयातील ज्या आस्थापना व कारखान्यांनी अद्याप www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी केली नाही व ज्यांना कुशल किंवा अकुशल कामगारांची आवश्यकता आहे. तसेच रिक्तपदे अधिसुचित करणे कायदा 1959 नुसार सर्व आस्थापनांना नोंदणी करणे बंधनकारक आहे. विभागाच्या www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर Employment > Emloyer या Option ची निवड करून नोंदणी करावी. तसेच पूढील लिंकवर क्लिक केल्यास नोंदणीचा फॉर्म उपलब्ध होईल  https://bit.ly/2YizINt सदर नोंदणी ही विनामुल्य आहे. ज्या आस्थापना व कारखान्यांना ज्या पदांची आवश्यकता आहे.  त्या प्रमाणे त्यांना बेरोजगार उमेदवारांची यादी उपलब्ध होऊ शकेल. तसेच ऑनलाईन रोजगार मेळावा घेऊन प्रत्यक्ष उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. तरी जिल्हयातील  इच्छूक नागरीकांनी तसेच आस्थापना व कारखान्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी केले. अधिक माहिती किंवा अडचण आल्यास या कार्यालयाच्या ई-मेल palgharrojgar@gmail.com तसेच  श्री. संतोष वाघ (लिपिक) यांच्या मोबाईल क्रमांक 8830213976 वर संपर्क साधावा.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...