पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत तर्फे आज वृक्षरोपण.
विरार : आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत यांच्या तर्फे यांनी विरार महामार्गा जवळ वृक्ष लागवड केली. वृक्षवल्ली आम्हां सोयरे.नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. झाडे लावून व पाणी वाचवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा सर्वांनी संकल्प केला पाहिजे असे मत
आम.राजेश पाटील यांनी व्यक्त केले. कोरोना महामारीच्या संकटात रक्तदान शिबिर आयोजित करून गरजूंना रक्त पुरवठा करण्यासाठी रक्तदान शिबिर चेही आयोजन केले.खूप चांगला प्रतिसाद मिळाला.झाडे लावा झाडे जगवा हा मोलाचा मंत्र देत पर्यावर्णाचे संरक्षण संवर्धन सर्वानी करावे असा संदेश देत जनते समोर नवा आदर्श ठेवला आहे. यावेळी प्रथम महापौर राजीव पाटील,खासदार बळीराम जाधव, काशिनाथजी पाटील,राजेंद्रजी पाटील ठाणे जिल्हा बँकेचे चेअरमन, कल्याणी तरे, नगरसेविका जयश्री किणी,सदानंद पाटील,अशोक पाटील तसेच पर्यावरण संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजय चोघळा,राज्य उपाध्यक्षा कुमुद शहाकार, राज्य समन्वयक विद्या नाईक,कोकण उपाध्यक्षा सुगंधा जाधव व परिसरातील अनेक कार्यकर्ते उपस्तिथ होते.