ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर्फे आंतरजिल्हा एसटी वाहतूक सुरू करा – मराठी एकीकरण समितीची मागणी.
आताच शेयर करा
May 16, 2020

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर्फे आंतरजिल्हा एसटी वाहतूक सुरू करा – मराठी एकीकरण समितीची मागणी

मिरारोड : महाराष्ट्र राज्यात शासकीय सार्वजनिक आंतरजिल्हा वाहतूक व्यवस्था कोव्हिड-१९ विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सुरक्षितता बाळगण्यासाठी बंद ठेवलेली आहे.

लॉकडाऊन काळात प्रवासाचे निर्बंध व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने सर्वसामान्य नागरिक, कामगार यांना मूळ गावी जाता येत नाही. सदर शासकीय वाहतूक सुविधा /व्यवस्था उपलब्ध नसल्याने विविध जिल्ह्यात अनेक कारणास्तव गेलेले नागरिक आजही त्या त्या ठिकाणीच अडकून पडलेले आहेत,

सामान्य नागरिक, कामगार तसेच संबंधित व्यक्ती आंतरजिल्हा सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेऊ इच्छितात त्यांच्याकडून आरोग्यविषयक प्रमाणपत्र घेऊन संबंधित आरक्षण धारकांची संपूर्ण यादी गंतव्य ठिकाण /आगार तालुकास्तरावरील शासकीय अधिकारी यांच्याकडे आगाऊ पोहोचेल अशी तजवीज करावी.  अशा स्वरूपाच्या नियम व अटींची पूर्तता असा योजनाबद्द आराखडा तातडीने आखून राज्य परिवहन विभागाने आगाऊ तिकीट आरक्षण प्रणाली तिकीट नोंद करून विविध आगारातून आंतरजिल्हा एसटी वाहतूक  सुरू करण्यासंबंधी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. ता.क. परराज्यातील स्थलांतरित मजूर यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एसटी  राज्याच्या सीमेपर्यंत तसेच महाराष्ट्र व केंद्र शासनाने रेल्वेची सोय केल्याने महाराष्ट्रातील कामगार, नागरिक यांना राज्यांतर्गत सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध केला नाही याचा संताप अनावर होईल,उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडेल याबाबत दक्षता घेणे नितांत गरजेचे आहे याची कृपया नोंद घ्यावी.असा इशारा मराठी एकीकरण समिती चे अध्यक्ष गोवर्धन देशमुख व उपाध्यक्ष आनंदा पाटील, यांनी दिला असून परिवहन मंत्री अनिल परब यांना इमेल द्वारे कळवले आहे.

संबंधित लेख

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.

मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती  मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...

मंगळवारी  वज्रेश्वरी येथे सत्संग मेळाव्याचे आयोजन.

वज्रेश्वरी :  श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा आयोजन समिती मुंबई च्या वतीने मंगळवार, दि. १८ मार्च २०२५  श्री क्षेत्र वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि.ठाणे...

महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले 

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला, यावेळी महिलांनी कायद्याचा दुरुपयोग करू नये, योग्य वेळी कायद्याचा वापर...