ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
गरजू माध्यमकर्मींना तातडीने जीवनावश्यक वस्तूंची मदत करा- एनयुजे महाराष्ट्र. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,सर्व पालकमंत्री यांना मदतीसाठी निवेदन
आताच शेयर करा
May 16, 2020

गरजू माध्यमकर्मींना तातडीने जीवनावश्यक वस्तूंची मदत करा-

एनयुजे महाराष्ट्र. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,सर्व पालकमंत्री यांना मदतीसाठी निवेदन

मुंबई – एनयुजे इंडिया शी संलग्न असणाऱ्या नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र च्या वतीने

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,तसेच सर्व पालकमंत्री यांना सर्व माध्यमकर्मींना तातडीने जीवनावश्यक वस्तूंचे सहकार्य करण्याचे निवेदन पाठवण्यात आले.

या आधीही मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देऊन केवळ कोविड १९ तपासणी महत्त्वाची नसून सद्यस्थितीत प्रथम जीवनावश्यक वस्तूंची मदत जिल्हावार होण्याची आवश्यकता असून पालकमंत्री यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असे निवेदन दिले होते.

मात्र शासनाकडून केवळ पत्र मिळाले पुढे पाठवले उत्तर आले, त्या दरम्यान एनयुजे महाराष्ट्र च्या पुढाकाराने राज्यभरात वंचित गरजू नागरिकांना मदत करतानाच गरजू पत्रकारांनाही  जीवनावश्यक वस्तूंचे  सहकार्य करण्यात आले. मात्र वाढती टाळेबंदी आणि एकूणच परिस्थिती पहाता आज पुन्हा एनयुजेमहाराष्ट्र च्यावतीने सर्वांना निवेदन पाठवणेत आले. या निवेदनाद्वारे सहायता आवाहन करताना एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी भूमिका स्पष्ट केली की, राज्याला कोरोना विरोधात अनेक आघाड्यांवर  लढावं लागतय आणि पत्रकारांना जगण्यासाठीही लढावे लागते आहे

अत्यावश्यक सेवेत अग्रक्रमाने स्थान असणारे प्रसार माध्यमकर्मी वगळता सर्वांना अनेक प्रकारे मदत मिळतेय , त्यांना कोरोना वाँरियर्स म्हणून विमा संरक्षणही मिळते आहे.

एनयुजे इंडिया,नवी दिल्ली ने केंद्र सरकारसह सर्व व राज्य सरकारकडे  गरजू पत्रकारांसाठी आर्थिक  सहायता आणि इतर मदत मागितली आहे तर एनयुजे महाराष्ट्र नेही महाराष्ट्र सरकारला  पत्रकारांसाठी सर्व सुरक्षा व आर्थिक पॅकेज व विमा संरक्षण मागणी केली होती तीच आमची आजही भूमिका आहे,  आणि यावर केंद्र व राज्य सरकार अभ्यास करून निश्चित सहकार्य  करतील .आणि ख-या गरजू श्रमिक पत्रकारांना ही मदत पोहोचेल असा विश्वास करदेकर यांनी व्यक्त केला.

मात्र संपुर्ण टाळेबंदी असताना जगणं कठीण झालंय!

आमचे श्रमिकपत्रकार छोटी साप्ताहिकं,मुक्तपत्रकार,अर्धवेळ,अंशकालिन पत्रकार,छायाचित्रपत्रकार अशा अनेकांच्या घरी खडखडाट आहे. मायबाप सरकारने या कठिण प्रसंगात किमान महिनाभर पुरेल अशा जीवनावश्यक वस्तुंची तातडीची मदत करावी ही विनंती या निवेदनात करण्यात आली असून राज्याच्या कोविड १९ विरोधातील लढाईत सदैव समन्वय सहकार्याची भूमिका घेणारा लोकशाहीचा हा  चौथा स्तंभही कोरोना योद्धा असून सरकारला आमच्या कडे जास्त काळ दुर्लक्ष करता येणार नाही आणि या योद्धयाला  तातडीने मदतीचा हात देऊन महाराष्ट्र सरकार बळ देईल अशी भावना एनयुजे महाराष्ट्र चे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शिवेंद्रकुमारजी आणि शीतल करदेकर यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...