अपर पोलीस अधीक्षक सागर यांनी जपली सामाजिक बांधिलकी,मुलाच्या वाढदिवसाचा खर्च दिला मुख्यमंत्री सहायता निधीला. नालासोपारा : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून वसईचे अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर हे नेहमी नवनवीन सामाजिक संदेश आपल्या कृतीतून देत असतात. त्यांचा मुलगा शौर्य विजयकांत सागर ६ ,याचा जन्म छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य दिनी झाला म्हणून त्याचे नाव शौर्य ठेवले. त्यांनी वाढदिवस मोठ्या थाटात साजरा न करता तो खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सहाव्या वाढदिवसा निमित्त १४ हजारांचा धनादेश वसईचे प्रांत अधिकारी स्वप्नील तांगडे याना शौर्यच्या हस्ते सुपूर्त केला. यापूर्वी लॉक डाऊन काळात आपल्या मुलाचे केस स्वतः कापून घरी राहा सुरक्षित राहा चा एकप्रकारे संदेश दिला होता. त्यांच्या या कृतीच सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.
मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...