मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला हजारोंची मदत.
नालासोपारा : नालासोपारा पूर्व ह्या भागातील सालसार पार्क “अ” सहकारी गृहनिर्माण संस्थेने कोरोनो च्या प्रादुर्भावाने झालेले नुकसान आणि भविष्यातील त्याचे दिसणारे परिणाम ह्याचा सारासार विचार करून, त्यांच्या संस्थेतील सभासदस्यांनी व तेथील रहिवाश्यानी एक महत्वाचं पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. कोरोनोच्या ह्या महामारी संकटात राज्य सरकारला मदत व्हावी म्हणून ह्या गृहनिर्माण संस्थेने पत्राद्वारे विनंती करून संस्थेतील सदस्यांना आणि रहिवाश्याना आवाहनाला प्रतिसाद देत २६,४०२ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडून सहायता निधी कोविड-१९ च्या नावाने धनादेश वसई तहसीलदार किरण सुरवसे यांना सुपूर्त करण्यात आली. याच अनुकरण करून शासनाला आणि जनतेला मदत करावी असे आवाहन ह्या संस्थेचे सचिव प्रशांत मुळीक ह्यांनी केले आहे. यावेळी संस्थेचे विजय मिस्त्री शंकर गोविलकर श्रीकृष्ण परब ,सचिन कदम उपस्थित होते.

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.
मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...