वसई विरार पालिकेत चमेकेगिरी वर आयुक्तांची टाच,
नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डी.गंगाधरन यांनी वसई विरार पालिकेच्या कर्मचारी अधिकारी यांच्या चमकेगिरी वर टाच आणली असून परिपत्रक महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना या परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले असून. शिस्तीचे पालन न करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा फतवा आयुक्त डी.गंगाधरन यांनी काढला आहे.
पालिकेच्या कार्यालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येताना टि-शर्टस् जाकीट, झब्बा, विनाकॉलर शर्टग, गबगी
चट्टेपट्टेदार असलेले शर्टस् कपडे,यापुढे कार्यालयात कोणीही
गॉगल,टोपी घालून वावरू नये. आपले केशरचना व दाढी शासकीय कार्यालयात शोभेल अशी ठेवावी. कार्यालयात आपले ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे तसेच ज्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेकडून गणवेश दिलेले आहेत त्यांनी कार्यालयीन वेळेस गणवेश परिधान करुनच कार्यालयात उपस्थित रहावे. महिला कर्मचाऱ्यांनीदेखिल कार्यालयीन वेळेत कार्यालयास साजेसे असे पोषाख परिधान करावा.
या परिपत्रकाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास कायम आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच ठेका अथवा कंत्राटी कर्मचाऱ्यांने उक्त परिपत्रकचे उल्लंघन केल्यास सदर कर्मचाऱ्यास ठेक्यातून तात्काळ कमी करण्यात येईल. असे फर्मान आयुक्त डी.गंगाधरन यांनी काढले आहे.