नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील पानबाई इमारती मधील काही रहिवाशी सोशल डिस्टन्स चे तीन तेरा वाजवत असल्याची तक्रार नालासोपारा पोलीस ठाण्यात केल्याने एका कुटुंबातील महिलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे सोशल डिस्टन्स चे तीनतेरा वाजवणाऱ्या विरोधात कारवाई करण्यास नालासोपारा पोलिसांनी असमर्थता दर्शवली आहे याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचे संकट घोंगावत असताना पानबाई इमारतीतील रहिवासी सोशल डिस्टन्सचा नियम धाब्यावर बसवून हौजी खेळत आहेत ४० ते ५० लोक एकत्र आल्याने या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो त्या मुळे त्याच ईमारतीत राहणारे कृती प्रेमजी देढीया यांनी सदर लॉक ऐकत नसल्याचे पाहून त्यांचा व्हिडिओ काढून नालासोपारा पोलिसांना दिला होता त्याचा राग मनात धरून कृती व तिच्या आईला व बहिणीला मारहाण केली याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आम्ही त्यांच्यावर लॉक डाऊन मुळे कोणतीही कारवाई करू शकत नसल्याचे नालासोपारा पोलिसांनी प्रेमजी देढीया यांना सांगितल्याचे त्यांनी सांगितले.