ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
वाल्मिकी धर्म समाजच्या वतीने २५० नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रचा पुढाकार.
आताच शेयर करा
May 9, 2020

वाल्मिकी धर्म समाजच्या वतीने २५० नागरिकांना जीवनावश्यक वस् तूंची मदत. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रचा पुढाकार.

नालासोपारा : टाळेबंदीचे काळात सगळ्यात जास्त गरजेचे आहे ती जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता!

सरकारचे माध्यमातून धान्यपुरवठ्यासाठी नियोजन केले जात आहे.

मात्र अनेकांना या वस्तूं मिळत नाहीत ,असे निदर्शनास आल्यावर नॅशनल युनियन ऑफ जर्नालिसटस् महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांचे मार्गदर्शनाखाली इतर संस्था, व्यक्ती यांचे सहकार्याने मदत केली जात आहे.

एनयुजेएमचे पालघर जिल्हाध्यक्ष विजय देसाई यांचे पुढाकाराने भारतीय वाल्मिकी धर्म समाज महाराष्ट्र ,नालासोपारा संघटनेच्या वतीने पूनम पवन बिडलान यांच्या सहकार्याने गरीब व गरजूंना नालासोपारा येथे मोफत अन्न धान्य वाटप करण्यात आले.

लॉक डाऊन मध्ये घरी बसलेल्यांना नालासोपारा पूर्वेकडील शिर्डी नगर, संयुक्त नगर, समेळ पाडा, आचोळे डोंगरी येथील ज्या नागरिकांचे रेशन कार्ड वर अन्न धान्य मिळत नाही तसेच  ज्या महिलांच्या घरात कमावती व्यक्ती नाही अश्या निराधार महिलांना भारतीय वाल्मिकी धर्म समाज महाराष्ट्र संघटन च्या पालघर जिल्हाध्यक्ष पूनम पवन  बिडलान यांनी  तीनशे  गरजू व निराधार लोकांना ६०० किलो तांदूळ , २०० किलो तुरडाळ आणि २०० किलो गोडतेल यांचे वाटप करण्यात आले.

या कामासाठी एनयुजेएम चे वतीने पूनम बीडलान  यांचे आभार मानण्यात आले.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...