ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र – जिल्हा पालघर च्या समन्वयाने मदत सुरू पालघर जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांची तत्काळ मदत
आताच शेयर करा
May 8, 2020

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र – जिल्हा पालघर च्या समन्वयाने मदत सुरू

पालघर जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांची तत्काळ मदत

पालघर – नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या समन्वयातून महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यात मदतीचा ओघ चालू आहे.
एनयुजे महाराष्ट्र अध्यक्षा शीतलताई करदेकर यांनी कोरोना महामारीच्या या काळात युनियनच्या माध्यमातून राज्यभर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या गरजूंना मदतीसाठी समन्वय सहकार्याचे सत्र सुरू ठेवले आहे. एन यु जे एम चे पालघर जिल्हाध्यक्ष विजय देसाई यांनी नालासोपारा पश्चिमेकडील फन फियेस्टा येथे मदतीसाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे व वसई प्रांत अधिकारी स्वप्नील तांगडे यांच्या निदर्शनास आणून दिले.
दुसर्‍या दिवशी लगेच त्यांच्या आदेशाचे पालन होत. मांडवी मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे यांनी वसई विरार महानगरपालिकेच्या गाडीने नरेश जाधव यांनी ३० कुटुंबाना घरपोच कीट दिले त्यामुळे त्या कुटुंबांनी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या अध्यक्ष शीतल करदेकर ,पालघर जिल्हाध्यक्ष ,विजय देसाई व डॉ. कैलास शिंदे ,वसई प्रांत स्वप्नील तांगडे, मांडवी मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे यांचे व शासनाचे आभार मानले.यांनी डाळ ,तांदूळ, कांदे, बटाटे, गोडेतेल या जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत पोहचवली आणि मजूर बांधवांना दिलासा मिळाला.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...