नालासोपाऱ्यातील त्या मजुरांना सिद्धार्थ ठाकूर यांंची मदत
एन यु जे एम च्या आवाहनाला ठाकुरांचा प्रतिसाद!
नालासोपारा : (अदिती खडसे ) नालासोपारा पश्चिमेकडील फन फियेस्टा च्या पाठीमागे ४० ते ४५ मजुरांच्या झोपड्या असून त्यांचा धान्यसाठा संपत आल्याने त्यांना धान्याची नितांत गरज असल्याची बाब बहुजन युवा विकास आघाडीचे अध्यक्ष सिद्धार्थ ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर सिद्धार्थ उर्फ चिकू दादा व स्थानिक नगरसेवक किशोर पाटील यांनी मजुरांच्या झोपड्यात जाऊन त्यांना धान्य व कांद्याचे वाटप केल.
नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र च्या महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या नेतृत्वाखाली, कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हाध्यक्ष विजय देसाई,विलास पाटील,युसुफ अली ,उमाकांत वाघ ,रुतीका वेंगुर्लेकर यांनी सिद्धार्थ ठाकूर यांच्याशी संपर्क करून ही मदत मिळवून दिली.
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अकोला ,अकलूजच्या आसपासच्या गावातील शेकडो मजूर अडकून पडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. हे सर्व मजूर नालासोपारा येथे नाक्यावर उभे राहून मजुरी करून आपली उपजीविका करायचे मात्र आता कामधंदा बंद झाल्याने त्यांच्या घरात चूल पेटेनाशी झाली .
हे मजूर फक्त ६ महिने कामासाठी येतात .
आपल्या राज्यात कुणीही उपाशीपोटी रहाणार नाही याचे आश्वासन राज्यशासनाने दिले आहे. .
काही राजकारणी जे फक्त आपल्या मतदारांनाच मदत करत असल्याचे समोर येत असताना सिद्धार्थ उर्फ चिकू दादा हे त्याला अपवाद ठरले आहेत. “या मजुरांकडे कोणतेही रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र नाही असे असताना सुद्धा ते मतदार नसले म्हणून कायझाले ते माणूस आहेत ना? मग त्यांना छोटीशी मदत का होईना मी करतो !” असे विजय देसाई यांना सांगून नगरसेवक किशोर पाटील यांनी त्या मजुरांना धान्य वाटप केले.
या मिळालेल्या मदतीमुळे मजूर भावूक होऊन नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र व बहुजन विकास आघाडीचे युवा विकास आघाडीचे अध्यक्ष सिद्धार्थ ठाकूर यांचे आकाश राठोड यांनी ४५ कुटुंबाच्या वतीने आभार मानले.