ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा : शीतल करदेकर
आताच शेयर करा
Dec 23, 2019

पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा : शीतल करदेकर

जालना : महाराष्ट्रात पत्रकारिता करीत असतांना पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्यात गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नसल्याने या गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टस महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांनी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून कडक कारवाईची मागणी केली आहे.
जालना येथील पत्रकार विकास बागडी यांनी गुटखा माफियां विरुद्ध बातमी प्रसिद्ध केल्यामुळे त्यांच्या वर गुटखा माफियांनी डोक्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. याविरुद्ध
नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टस महाराष्ट्र जालना शाखेच्या वतीने पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे पत्रकार हल्ला कायद्या अंतर्गत गुन्हा दाखवण्याची मागणी करण्यात आली होती. पोलिस प्रशासनाने तत्परता दाखवत पत्रकार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला पण आरोपींना जामीन मंजूर झाला त्यामुळे तपासणी अंमलदार यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. याबाबत आज नागपूर येथे विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन यासंदर्भात पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्यात गुन्हेगारांवर कडक कार्यवाही करीत कडक अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी केली

विकास बागडी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना जामीन मिळाल्याबद्दल पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांना विचारणा केली असता त्यांनी हल्लेखोरांना त्वरित अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली. पत्रकार कायद्या अंतर्गत त्यांच्या वर पुन्हा कारवाही केल्यास त्यांना जामीन मिळू नये अशी मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टस महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांनी पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्याकडे केली आहे.
गुन्हेगारांना जामीन मिळू नयेत व कठोर शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे एस चैतन्य यांनी यावेळी सांगितले.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...