ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
मेट्रोसह अनेक विकास प्रकल्प मार्गी लावल्याने मला कौल द्या . नरेंद्र मेहता
आताच शेयर करा
Oct 17, 2019

मेट्रोसह अनेक विकास प्रकल्प मार्गी लावल्याने मला कौल द्या . नरेंद्र मेहता

विकास कामांची जंत्री सांगताना आम.मेहता

भाईंदर : दहिसर ते मिरा भाईंदर मेट्रो मार्ग नऊ या प्रकल्पासह मिरा भाईंदरवासियांच्या दृष्टीने महत्वाची अशी विकासकामे मार्गी लावल्याने यंदाही भाजप महायुतीला विजयी करा असे आवाहन उमेदवार नरेंद्र मेहता यांनी मतदारांना केलं आहे. मिरा भाईंदरमध्ये मेट्रो प्रकल्प येणारच नाही असा प्रचार हितशत्रुंनी चालवला असतानाही मा. नरेंद्र मेहतांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मिरा भाईंदर शहर मेट्रो रेल्वेच्या नकाशावर आले. याशिवाय मिरा भाईंदर परिसरातील वाढती लोकसंख्या पाहता मुंबईला जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वसई उड्डाणपुलाच्या चौपदरीकरणाचे कामही मार्गी लावल्याने मिरा भाईंदर परिसराचा आगामी काळात मुंबईशी वेगवान संपर्क शक्य होणार आहे.

मुंबई मेट्रो मार्ग नऊ म्हणजेच दहिसर ते मीरा भाईंदर हा एकूण १०.४१ किलोमीटर लांबीचा असून पूर्णत: उन्नत स्वरुपाचा आहे. मीरा-भाईंदर आणि मुंबई उपनगरांना जोडणाऱ्या या मार्गामुळे प्रवासाच्या कालावधीमध्ये ३० ते ४० मिनिटांची बचत होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर साधारण बारा लाख प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. मेट्रोच्या मंजुरीशिवायमा. मेहतांनी गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेली पाण्याची समस्या सोडवून मतदारसंघासाठी साडेसात कोटी लिटर पाणी मंजूर करून घेतले. अनेक दिवसांपासूनच्या मिरा भाईंदरकरांच्या मागणीनुसार पोलीस आयुक्तालय, न्यायालय आणि तहसिलदार कार्यालयाचे कामही सुरू झालेय. याशिवाय सिमेंटचे रस्ते, मेट्रो प्रकल्प, सागरी महामार्ग, जेसलपार्क ते घोडबंदरपर्यंत ३५० कोटींचा लिंक रोड, पाण्यासाठी राज्य सरकारकडून ३०० कोटींचं अनुदान मंजूर झालेले आहे. याशिवाय मच्छरमुक्त मीरा भाईंदर आणि स्वच्छतेसाठी राज्य सरकारकडून मोठा निधी, वर्सोवा खाडीपुल, अग्निशमन दलाचे अद्ययावतीकरण, डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची स्थापना, २० कोटींचं बुद्धविहार आणि आंबेडकर भवन अशी अनेक कामे गेल्या पाच वर्षांत मार्गी लागली. या कामांसाठी मा. मेहतांनी केलेला पाठपुरावा लक्षात घेऊनच प्रचार मोहिमेदरम्यान त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आपल्यालाच मिळत असल्याचा दावा नरेंद्र मेहता यांनी केला आहे.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...