ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
शिवसेनेने ..शिवसेनेच्याच खासदारांना डावलले. निवडून येण्यापूर्वी हुकुमशाही सुरु ?
आताच शेयर करा
Oct 10, 2019

शिवसेनेने ..शिवसेनेच्याच खासदारांना डावलले. निवडून येण्यापूर्वी हुकुमशाही सुरु ?

नालासोपारा :  पालघर जिल्ह्यातील वसई ,नालासोपारा ,आणि बोईसर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले असून तिन्ही उमेदवारांचे फोटो आम्ही महायुतीच्या नेत्यांचे फोटो झळकत असले तरी नुकतेच शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या खासदार राजेंद्र गाविताना डावलल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हे निवडून येण्यापूर्वी खासदारांचे अस्तित्व नाकारून असे वागत असतील तर निवडून आल्यानंतर खासदारांना काय किमत देतील असा सवाल जनता विचारात आहे. खासदारांचा फोटो नसलेला फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

कॉंग्रेसला सोड चिट्ठी देवून सेनेला जातीयवादी म्हणणारे वसई विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार विजय पाटील यांना तिकीट दिल्याने स्थानिक इच्छुकां मध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. बहुजन विकास आघाडीला सोडचिट्ठी देवून सेनेत आलेले बोईसर मतदार संघात विलास तरे ,आणि नालासोपारा मतदारसंघात एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा,वसई मतदारसंघात विजय पाटील  यांचे फोटो असलेला शिवसेना भाजप,रिपाई , रासप च्या ऐवजी रासम,शिवसंग्राम ,रयतक्रांती,महायुतीचे उमेदवार सुरवात सुराज्याची असे लिहिलेल्या नालासोपारा ,वसई ,बोईसर मतदार संघाच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी खासदार राजेंद्र गावितांचे अस्तित्व नाकारत आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यांच्या बॅनरवर .जगन्नाथ नड्डा,नितीन गडकरी,चंद्रकांत पाटील,आदित्य ठाकरे,रामदास आठवले(आर.पी.आय),महादेव जानकर (रा.स.प.),विनायक मेटे(शिवसंग्राम),सदाभाऊ खोत,एकनाथ शिंदे,रवींद्र चव्हाण यांचे फोटो लावण्यात आले असून भाजपच्या नेहा दुबे,राहुल सिंह,सुभाष साटम, शिवप्रताप सिंह, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांचे फोटो त्या बॅनरवर झळकत असून शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचा फोटो सगळेजण शोधात असून गावितानी सेनेचा राजीनामा दिला आहे का ? जर नसेल तर त्यांचे अस्तित्व कोण नाकारत आहे. हे आता नागरिक विचारत आहेत. त्यामुळे सेना भाजप युती झाली असली तरी आम्ही करू ती पूर्व म्हणणाऱ्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना समज न दिल्यास त्याचा फटका युतीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान खासदार राजेंद्र गावित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

संबंधित लेख

“ननंद-भावजाई सन्मान सोहळा” ठरला अविस्मरणीय!

नालंदा माहेर वाशिम व आम्रपाली महिला मंडळ चोरवली यांचा उपक्रम महिलांच्या हृदयात जागा करून गेला  नालासोपारा : वाशिम जिल्ह्यातील नालंदा माहेर व...

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.

मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती  मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...

मंगळवारी  वज्रेश्वरी येथे सत्संग मेळाव्याचे आयोजन.

वज्रेश्वरी :  श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा आयोजन समिती मुंबई च्या वतीने मंगळवार, दि. १८ मार्च २०२५  श्री क्षेत्र वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि.ठाणे...