ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
नालासोपारा सेनेच्या वचननाम्यात मुख्य विषयांना बगल, प्रकाशक मात्र अनभिज्ञ ..
आताच शेयर करा
Oct 10, 2019

नालासोपारा सेनेच्या वचननाम्यात मुख्य विषयांना बगल, प्रकाशक मात्र अनभिज्ञ ..

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील रिजन्सी हॉल मध्ये शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या संपन्न सोपारा या वचननाम्याच प्रकाशन आमदार रवींद्र फाटक आणि पूर पिडीत लोकांच्या हस्ते करण्यात आल यावेळी या वाचननाम्यात स्थानिक मुद्देच गायब असल्याचे दिसले याबाबत प्रकाशक यांना विचारले असता त्यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेने यावेळी पुरमुक्त विरार-नालासोपारा, शुदध पानी,टॅकरमुक्त विरार-नालासोपारा,आरोग्यसंपन्न विरार-नालासोपारा,क्लस्टर डेव्हलपमेंट,वाहतुक कोंडीतून मुक्तता,महानगरांशी कनेक्टिव्हिटी,सर्वासाठी दर्जेदार परवडणाऱ्या शिक्षण सुविधा,सार्वजनिक परिवहन सेवा,रोज़गार निर्मिती,वीजपुरवठा,मैदान आणि उद्याने,सांस्कृतिक,क़ायदा व सुव्यवस्था,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक. आदी घोषणाचा पाऊस पाडला मात्र शिवसेनेचे तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी निवडून आल्या नंतर नालासोपारा शिवसेना शाखेत ३० डिसेंबर २०१४ ला वसई माणिकपूर येथे शीत शवागृह उभारणार असल्याचे आश्वासन निवडून आल्या नंतर दिले होते याबाबत आमदार रवींद्र फाटक यांनी बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी पाठपुरावा केला नसल्याने ते झाल नसल्याची कबुली दिली तर आमचा आमदार निवडून आल्यावर आम्ही करू असे सांगितले मात्र तुमचा आमदार नसल्याने तुम्ही मुद्दाम केले नाही का या प्रश्नाला फाटक यांनी सोयीस्कर बगल दिली. येथील डम्पिंग ग्राउंड चा मुद्दा,जिल्हापरिषद शाळा हस्तांतरण,या प्रमुख मुद्दे त्यांच्या वचननाम्यातून गायब होते. आम्ही स्मारक उभारणार, मात्र ते कोणत्या जागेत उभारणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही महानगरपालिकेने आरक्षित असलेल्या जागेत उभारणार असल्याचे म्हटले आहे मात्र त्या साठी लागणारा आराखडा तयार केलेला नाही फक्त कागदी घोडे नाचवले जात आहेत. यातून जनतेला काय मिळणार फक्त आश्वासन.

सेनेचा डाव उलटला ….बविआ सोबत त्यांची हि झाली पोलखोल..

या पत्रकार परिषदेत महिलेने बहुजन विकास आघाडीच्या रघुवीर ठाकूर  बिल्डरने एक वर्षाचे भाडे दिले त्यानंतर फसवणूक केली त्यांना पाणी लाईट वाचून रहाव लागत आहे त्यासाठी त्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर,प्रशांत राउत यांच्याकडे त्यांना फक्त आश्वासनच मिळाले मला न्याय हवा अस म्हणत असताना  त्यांच्या शिवसेनेच्या दिलीप पिंपळे भाजपचे सुभाष साटम यांच्याकडे पण गेल्या होत्या त्यांनी सुद्धा आश्वासनच दिले मात्र कोणीच मदत केली नाही त्या शिवसैनिकांची नाव आल्याने आमदार रवींद्र फाटक यांनी डोक्याला हात लावला आणि आम्ही तुमची समस्या दूर करू असे सांगून निभावून नेले. बहुजन विकास आघाडी सोबत त्यांची स्वतःची ही  पोलखोल झाल्याची चर्चा चांगलीच रंगली. गेली अनेक वर्षे खेटे मारणाऱ्या फसवणूक झालेल्या नागरिकांना का कोणी न्याय दिला नाही.. कि फक्त आश्वासनांचे गाजर हे राजकारणी देणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.दरम्यान शिवसेनेच्या वचननाम्यात प्रकाशक म्हणून नाव असलेले माजी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांना डम्पिंग ग्राउंड,शीत शवागृह,दफनभूमी सारखे जिव्हाळ्याचे प्रश्न तुम्ही का घेतले नाहीत यावर त्यांनी मला माहित नाही असे सांगितले ..जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रकाशक म्हणून त्याचे नाव दाखवल्यावर तेही चकित झाले. त्यानंतर त्यांनी सारवासारव केली. प्रदीप शर्मा यांच्या प्रचाराची धुरा कोणताही नियोजन कधी न केलेल्यांना दिल्याने सेना स्थानिक मुद्द्याबाबत अनभिज्ञ दिसत आहे. तसेच भाजपच्या नाराजांची नाराजी अद्याप घालवण्यात सेनेच्या प्रचार नियोजन प्रमुखांना यश आले नसल्याचे बोलले जात आहे. पत्रकारांना ११ वाजता बोलावून स्वतः मात्र १२ च्या नंतर आले. त्यामुळे शर्मांना नियोजन अभावाचा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...