ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
पालघर जिल्ह्यातील सामाजिक संदेश देणारी प्रशांत राउत यांच्या दहीहंडी ची सर्वत्र चर्चा. राउत कोणाची राजकीय हंडी फोडणार ?
आताच शेयर करा
Aug 25, 2019

विरार : बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ, नगरसेवक संघटक सचिव अजीव पाटील, स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत आयोजित युवा आमदार दहीहंडी उत्सव २०१९ च्या हंडीची सर्वत्र चर्चा होताना दिसत असून राउत कोणाची राजकीय हंडी फोडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

7 थर लावलेल्या पथकांमधून चिठ्ठी काढून युवा आमदार दहीहंडी फोडण्याचा मान मिळालेल्या कारगिलनगर मनवेलपाडा येथील ॐ शिवसाई धाम मंदिर गोविंदा पथकाने 7 थर लावून हंडी फोडली त्याना रोख रु.1,11,000 व सन्मानचिन्ह तसेच महिलासाठी लावलेली हंडी मनवेलपाडा येथील जय दुर्गा महिला गोविंदा पथकाने फोडली.त्यांना रोख रू.25000 व सन्मानचिन्ह लोकनेते हितेन्द्र ठाकूर, युवा आमदार क्षितीज ठाकूर देण्यात यांचे हस्ते देण्यात आले.

या वेळी माजी उपमहापौर उमेश नाईक, सभापती अतुल साळुंखे, सभापती नीलेश देशमुख, नगरसेवक किशोर पाटील, वैभव पाटील नगरसेविका

रजनी पाटील, हेमांगी पाटील, आयोजक सभापती प्रशांत राऊत मराठी कलाकार गांव गाता गजाली टी.व्ही. मालिकेतील दीपाली जाधव, किशोर राणे, दूर्वा  मालिकेतील हर्षद अतकरी, बिग बॉस मधील कलाकार रूपाली भोसले, हिंदी सिरियल बालवीर, क्राईम पेट्रोल, व बॉडीगार्ड, डिशुम सिनेमाचे कलाकार दीपक वर्मा, रोहित सिंग उपस्थित होते. या वेळी नालासोपारा येथील ॐ साई नवभारत पथकाने थरांच्या माध्यमातून उरी सर्जिकल स्ट्राईक व महाराष्ट्रातील पूरग्रस्त यावर देखावा सादर केला.त्यांना रु.११००० व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सदर दहीहंडी उत्सवात १०,१२ वी परीक्षेत ८५ टक्के व अधिक गुण मिळालेल्या मनवेलपाडा विभागातील सुमारे ८५ विद्यार्थी यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवराच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

या वेळी उपस्थित वसई विरार शहर महानगर पालिकेचे नवनिर्वाचित महापौर प्रवीण शेट्टी यांचा विशेष सन्मानचिन्ह व वृक्ष रोप देऊन तसेच माजी महापौर नारायण मानकर उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्स, परिवहन सभापती प्रीतेश पाटील, यांचा सन्मानचिन्ह व शाल देऊन सभापती स्थायी समिती प्रशांत राऊत यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

सदर उत्सवास माजी महापौर राजीव पाटील,सभापती भरत मकवाना, महिला बाल कल्याण सभापती माया चौधरी, सभापती यज्ञेश्वर पाटील , ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल साने, डॉ.प्रवीण क्षीरसागर, नगरसेवक सचिन देसाई,माजी नगरसेविका विलासबंधू चोरघे, सुरेन्द्र सिंग दत्ता साने, नगरसेविका सुरेखा कुरकुरे, रिता सरवैया, पुष्पा रूपानी, प्रज्ञा देसाई, वासंती पाटील, शोभा मोरे, ममता सुमन, मिनल पाटील, चिरायू चौधरी, विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्त्यां, उपस्थित होते.या वेळी दहीहंडी पाहण्यासाठी नागरिक महिला, मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.या दहीहंडी उत्सवात आलेल्या गोविंदा पथकांसाठी जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट, ॐ श्री साईधाम मंदिर ट्रस्ट यांचे सौजन्याने भोजन व्यवस्था करण्यात आली होती. या दहीहंडी उत्सवात मनवेलपाडा विभागातील कलाकारांनी आपली नृत्य सादर करून उपस्थित रसिकांचे मनोरंजन केले.या वेळी विविध मीडिया प्रतिनिधी व पत्रकार उपस्थित होते.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...