श्री गणेश सामाजिक प्रतिष्ठान व नँशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांना मदत
नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील सेन्ट्रल पार्क येथून श्री गणेश सामाजिक प्रतिष्ठान व नँशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनी कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली.यावेळी श्री गणेश सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष भागेश देसाई,सोमनाथ अडागळे,दिनकर हडशी व नँशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र,कोषाध्यक्ष वैशाली आहेर,पालघर अध्यक्ष विजय देसाई,विपुल पाटील आदि उपस्थित होते.
श्री गणेश सामाजिक प्रतिष्ठान व नँशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून हि फेरी काढली याला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला कोणी,साखर,गहू,तांदूळ,कांदे,बटाटे असे साहित्य देण्यात आल.
सामाजिक बांधिलकी जपत या संघटनेला नँशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र च्या अध्यक्ष शीतल करदेकर,महासचिव सीमा भोईर,कोषाध्यक्ष वैशाली आहेर, संघटन सचिव
कैलास उदमले,विशाल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा शाखेने हातभार लावला आहे.आणि हि मदत ग्रामीण भागतील पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश चिकणे,विजय गांजावाला,विजय गायकवाड,भावना बारोट,निशा धराधर,विलास पाटील,रुतिका वेंगुर्लेकर,महेश बने,हरेश फुलसुंदर,यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.