ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
रासपच्या मेळाव्याला वसई –पालघर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते जाणार.
आताच शेयर करा
Aug 20, 2019

रासपच्या मेळाव्याला वसई –पालघर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते जाणार.
नालासोपारा : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मुंबई येथे शिवाजी पार्कवर दि.२५ ऑगस्ट रोजी महामेळावा घेण्यात येणार असून वसई विरार सह पालघर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव तसेच शेळी मेंढी महामंडळ अध्यक्ष (राज्य मंत्री दर्जा )बाळासाहेब दोडतले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष अक्कीसागर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे,प्रमुख उपस्थिती गिरिराज सिंह , केंद्रीय मंत्री पशु संवर्धन , रामदास आठवले केंद्रीय मंत्री सामजिक न्याय मंत्रालय , चंद्रकांत पाटिल , महसूल मंत्री ,
रासप दौंड विधान सभा आमदार राहुल कुल ,व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे. देशातील उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी बसविण्यासाठी व धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आणि देशात मोठी चळवळ निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना महादेव जानकर यांनी चौंडी येथे केली. यापूर्वी सत्तेवर असणा-या पक्षांनी धनगर समाजाच्या आरक्षणाकडे कानाडोळा केला. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महादेव जानकर यांनी राज्यात रान उठवलं.याच संधीचा फायदा घेत भाजपने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. यासाठी कायदेशीर लढाई चालू ठेवली आणि याचाच पुढचा भाग हणजे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेक योजना समाजाच्या पदरात पाडून घेतल्या. आणि एस.टि.एस .सी . च्या सवलती लागू करून घेतल्या आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटिल यांनी दिली तसेच या महामेळाव्यl करता मुंबई , ठाणे , पालघर, रायगड , तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...