श्री गणेश सामाजिक प्रतिष्ठान आणि
नँशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र,पालघर जिल्हा
कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना
मदतीचे आवाहन
नालासोपारा : कोल्हापूर-सांगलीमध्ये पुराने हाहाःकार माजवला आहे. पण या अस्मानी संकटासोबतच आणखी एक संकट आता आ वासून उभं राहणार आहे ते झपाट्याने पसरणार्या रोगराईचे, तसेच तेथील लोकांची जिवनावश्यक वस्तूंचीही वानवा जाणवत आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन मदतीचा ओघ चालू आहे.डाळ, साखर, चहा पावडर, तेल, बॅटरी, मेणबत्या, टुथ ब्रश, माचिस बॉक्स, पेस्ट, फुड प्लेट्स, साबण, ब्लँकेट्स, शाल, बेडशीट, मच्छरदाणी, मच्छरकॉईल, बिस्कीट पुडे, ओआरएस पॅकेट्स, नविन कपडे, औषधे, उबदार कपडे, लहान मुलांचे कपडे, सॅनिटरी नॅपकिन्स इत्यादी पैकी आपण मदत करु शकता. श्री गणेश सामाजिक प्रतिष्ठान व नँशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र,पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनी कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदत फेरी सकाळी १० वाजता नालासोपारा पूर्वेकडील सेन्ट्रल पार्क येथून काढणार आहेत.तरी या मदत फेरीत सर्वांनी सामील होवून सहकार्य करण्याचे आवाहन श्री गणेश सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष भागेश देसाई,सोमनाथ अडागळे,खजीनदार दिनकर हडशी आणि नँशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र, महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर,महासचिव सीमा भोईर ,कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली,पालघर अध्यक्ष विजय देसाई,सचिव अनिल पाटील,उपाध्यक्ष उमाकांत वाघ,रवींद्र घरत ,सत्यवान तरे, होशयारसिंग राज दसोनी ,विपुल पाटील,यांनी केले आहे.