सेफ्टी टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन मजुरांचा विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यू.बिल्डर सुपरवायझर वर गुन्हा दाखल.
नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे गावातील विनय कॉम्प्लेक्स मधील आनंद व्ह्यू सोसायटीमध्ये सेफ्टी टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यू झाला. आहे. सुनील चवरिया २५, बिका बुंबक ३५, प्रदीप सरवटे ३० अशी मयतांची नावे आहेत. नालासोपारा हनुमान नगर १ व गोखीवरे देवीपाडा येथे दोघे राहत होते.
आनंद व्ह्यू या सोसायटीची सेफ्टी टँक भरल्याने साफ करण्यासाठी हे कामगार उतरले होते. मात्र, टाकीमध्ये जमा झालेल्या विषारी वायुमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. याबाबतची माहिती रहिवाशांनी अग्निशमन जवानांना दिल्यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास टँकमधून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पुढील तपासासाठी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून नालासोपारा पोलीस तपास करत आहेत. या तिघांच्या मृत्यू नंतर वाल्मिकी समाज एकत्र आला असून मयतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देण्याची भारतीय वाल्मिकी धर्म समाज चे महाराष्ट्र अध्यक्ष पवन बिडलान यांनी केली आहे.दरम्यान, या तीन कामगारांचा झालेला मृत्यू बाबत नालासोपारा पोलिसांनी निष्काळजीपणा केल्या प्रकरणी बिल्डर रमेश भोरा,सुरेश जैन,पुष्कर जैन,धर्मेश जैन,विनोद जैन,नंदलाल दुबे,तेजप्रकाश मेहता,इतर भागीदार व सुपरवायझर अबुसामद अबुसिद्धीकी शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी सांगितले आहे.