झटपट श्रीमंतीच्या नादात,पोलीस कोठडीत रवानगी.
नालासोपारा : वसईतील वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हेप्रकटीकरण शाखेला दिवसा व रात्री घरफोडी केलेल्या १० गुन्ह्यांचा पर्दाफाश करून झटपट श्रीमंतीच्या नादात चार आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवसा व रात्रौ घरफोडीचे गुन्हयात वाढ झाल्याने पोलीस स्टेशन स्तरावर गुन्हेप्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुन्हयाचे घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषण करुन कौशल्याने आरोपी अंकीत उर्फ बंर्टी यादव २२ , शिवपुजन जयश्री प्रजापती , संदीप प्रेमसिंग बटवाडे २२ ,बादल प्रेमसिंग बटवाडे वय १९ यांना अटक करुन त्यांची चौकशी केली असता त्यांनी १० गुन्हे केल्याची कबुली दिली . त्यांच्याकडून आतापर्यंत १,१५,००० रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे.त्यांनी माणिकपुर व वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्र व बँक ऑफ बडोदा या बँकामधील तिजोरीत असलेली रक्कम चोरी करुन झटपट श्रीमंत होण्याचे आरोपी यांची इच्छा असल्याने त्यांनी बँकेत घरफोडी चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.असे तपासात निष्पन्न झाले आहे.