ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
विरोधी पक्ष दिसत नाही. कॉंग्रेस ,भ्रष्ट्वादी कॉंग्रेस कुठे पळून गेले का अस चित्र दिसतंय -आदित्य ठाकरे…
आताच शेयर करा
Apr 25, 2019

डहाणू (प्रतिनिधी ) डहाणू येथे महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित हजारोंच्या जन समुदायास संबोधित करताना विरोधी पक्ष दिसत नाही. कॉंग्रेस भ्रष्ट्वादी कॉंग्रेस कुठे पळून गेले का अस चित्र दिसतंय महाराष्ट्रात फक्त भगवा रंग दिसतोय.

काँग्रेस आणी भ्रष्ट्रवादी काँग्रेस कुठेच दिसत नाही. राष्ट्रवादी नसून ती भ्रष्ट्रवादी काँग्रेस आहे. अशी टिका त्यांनी केली आहे. तर आमची सत्तेची पाच वर्ष ही मागील सरकारची पाप धुण्यात गेल्याचे सांगत आता येणाऱ्या पाच वर्षात आम्ही विकास करणार, काम करणार असे जाहिर केले.

बहुजन विकास आघाडी हा पक्ष वा संघटना नसून गुंडांची टोळी व त्यांचे मिञ पक्ष चिंधीचोर असल्याची टिका करत जर, राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर देशाचं कार्टून नेटवर्क होईल अशी उपहासात्मक टिका केली आहे.महायुतीने जर काश्मीर मधील ३७० कलम काढल्यास बहुजन विकास आघाडी देखील महायुतीत सामिल होईल व आपल्याला पाठिंबा देईल, कारण त्यांना फक्त जमीनीत जागेत रस आहे. त्यामुळे गुंड व चिंधी चोरांना मतदान करण्या पेक्षा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी व विकासासाठी शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावीत यांचा विजय तर निश्चितच आहे पण बहुमताने निवडणून देण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.

संबंधित लेख

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.

मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती  मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...

मंगळवारी  वज्रेश्वरी येथे सत्संग मेळाव्याचे आयोजन.

वज्रेश्वरी :  श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा आयोजन समिती मुंबई च्या वतीने मंगळवार, दि. १८ मार्च २०२५  श्री क्षेत्र वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि.ठाणे...

महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले 

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला, यावेळी महिलांनी कायद्याचा दुरुपयोग करू नये, योग्य वेळी कायद्याचा वापर...