भारताची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ५ मिलियन डॉलर होईल- राजनाथ सिंह.
नालासोपारा : नालासोपारा येथील सेंट्रल पार्क मैदानात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह सभेसाठी आले होते त्यांनी कॉंग्रेस –राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला ते म्हणाले शरद पवारांना निवडणुकीची हवा चांगली कळते म्हणून त्यांनी आधीच निवडणुकीतून माघार घेतली. देशाची अर्थव्यवस्था जलद गतीने वाढत असून २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ मिलियन डॉलर होईल.आपला देश गरीब नसून बलवान होत असल्याचेहि त्यांनी सांगितले.
नालासोपारा सेंट्रल पार्क मैदानात राजनाथसिंह यांना ऐकण्यासाठी तुफान गर्दी जमली होती. २०१४ मध्ये जगातील १० देशात भारत ९ व्या स्थानावर होता आज भारत ६ व्या स्थानावर पोहचला. काही महिन्यात भारत ५ व्या स्थानावर जाणार असून जगात ३ देश ताकदवान मानले जातात रुस,चीन,अमेरिका या ३ देशातील एका देशाला मागे टाकून भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कॉंग्रेसच्या राज्यात नॅशनल हायवे ७,८,जास्तीत जास्त १२ किलोमीटर बनायचे आणि आता २९ ते ३२ किलोमीटर प्रतिदिन बनत आहेत. असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे देश बलवान बनवण्यासाठी शिवसेना भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.यावेळी व्यासपीठावर गृहमंत्री राजनाथ सिंह,सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे ,शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक,मनीषा कायंदे,उमेदवार राजेंद्र गावित.नवीन दुबे,शिरीष चव्हाण,यांच्यासह शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.