उद्धव ठाकरेंवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. एकनाथ शिंदे.
विरार : विरार येथे राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आम.हितेंद्र ठाकूर यांचे नाव न घेता त्यांचा तोल जातो ते बेहोष असतात असा टोला लगावला. ते पुढे म्हणाले कि त्यांना उद्धव ठाकरेंवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आहे.गोरगरीब जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केल तर तुम्ही सर्वसामान्य माणसाची जमीन हडप करण्याचे काम केल,तुम्ही सर्वसामान्य माणसाला बेघर करण्याचे काम केलंय,आदिवासींना लुटण्याचे काम केलंय बाळासाहेब म्हणायचे गुंड असावा पण षंढ नसावा पण तो गुंड कसा असावा तो मायाभागिनी चे रक्षण करणारा असावा तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे सर्वसामान्य लोकांचे जमिनी हडपून मोठमोठे टॉवर उभे करणारे तुम्ही ,याठिकाणी अनेक लोकांचे खून मुडदे पडणारे तुम्ही. ठाकूर यांनी जेल मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली असून ती लवकर पुरी करा असे शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.