डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे. खुशाल कारवाई करा,मी धमकीला घाबरणारा नाही.- आम.हितेंद्र ठाकूर.
नालासोपारा : बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्या प्रचारार्थ नालासोपारा येथील कांचन हायस्कूलच्या सभागृहात घेतलेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरार मधील सभेत वसई विरार महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे जाहीर केल्या नंतर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी पलटवार केला असून इडी ची धमकी द्यायला मी उद्धव ठाकरे नाही. असा टोला लगावला असून मुख्यमंत्र्यांनी वसईला काही दिले नसले तरी मला प्रमोशन दिल्याचे ठाकूर यांनी सांगितले. शिव्या मला सुद्धा देता येतात मी पीएचडी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना डिपार्टमेंट चा राजीनामा दिला का ? डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे कारवाई करा, कामाला लागा असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.