ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
ठाकुरांची जेलमध्ये जाण्याची इच्छा आम्ही पुरी करू – मुख्यमंत्र्यांचा हितेंद्र ठाकुराना नाव न घेता टोला.
आताच शेयर करा
Apr 24, 2019

ठाकुरांची जेलमध्ये जाण्याची इच्छा आम्ही पुरी करू – मुख्यमंत्र्यांचा हितेंद्र ठाकुराना नाव न घेता टोला.  

विरार : महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा विरार मधील मनवेल पाड्यात आले. यावेळी त्यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आम.हितेंद्र ठाकुरावर सडकून टीका केली ते म्हणाले त्याची जेलमध्ये जाण्याची इच्छा आम्ही तथास्तु म्हणून पुरी करू असे ठणकावून सांगितले.

ते पुढे म्हणाले कि वाघ आणि सिंह एकत्र आल्या नंतर जंगला मधील कितीही लांडगे आणि कोल्हे एकत्र आले तरी ते लढाई जिंकू शकत नाही.आता हि लढाई वाघ आणि सिंहच जिंकणार आहे.वाघ आणि सिंह एकत्र आल्यावर काय होत बघा हिंदीत म्हणतात शिट्टी पिट्टी गुम नो शिट्टी..या निवडणुकीत फैसला हाच करायचा आहे. देश भक्ता सोबत राहायचं कि भ्रष्टाचाराच्या सोबत राहायचं ,देशाला स्वाभिमानाने उभं करणाऱ्या सोबत राहायचं कि देश विकणाऱ्यांना मदत करणाऱ्या सोबत राहायचं याचा फैसला करणारी निवडणूक आहे. हितेंद्र ठाकूर यांचे नाव न घेता काही लोकांना जेलमध्ये जाण्याची घाई झाली आहे.ते म्हणतात तुमची वेळ आली कि तुमचा नंबर लावू आमच्या कोठडी मध्ये खूप लोक लाईन लावून आहेत.एकच कोठडी नाही आहे.पुष्कळ कोठड्या आहेत.जेजे भ्रष्टाचार,दुराचार,अनाचार करतील त्या प्रत्येकासाठी कोठडी तयार ठेवली आहे.ज्याचा ज्याच्या मनामध्ये कोठडीत जायचं आहे.त्यांना तथास्तु म्हटल्या शिवाय आम्ही राहणार नाही.यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आम.हितेंद्र ठाकूर यांचे नाव न घेता त्यांचा तोल जातो ते बेहोष असतात असा टोला लगावला. ते पुढे म्हणाले कि त्यांना उद्धव ठाकरेंवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आहे.गोरगरीब जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केल तर तुम्ही सर्वसामान्य माणसाची जमीन हडप करण्याचे काम केल,तुम्ही सर्वसामान्य माणसाला बेघर करण्याचे काम केलंय,आदिवासींना लुटण्याचे काम केलंय बाळासाहेब म्हणायचे गुंड असावा पण षंढ नसावा पण तो गुंड कसा असावा तो मायाभागिनी चे रक्षण करणारा असावा तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे सर्वसामान्य लोकांचे जमिनी हडपून मोठमोठे टॉवर उभे करणारे तुम्ही ,याठिकाणी अनेक लोकांचे खून मुडदे पडणारे तुम्ही. ठाकूर यांनी जेल मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली असून ती लवकर पुरी करा असे शिंदे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून ठाकुरावर घणाघात केला. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,राज्यमंत्री रवींद्र चव्हाण,सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे ,उमेदवार राजेंद्र गावित,आगरी सेनेचे जनार्धन पाटील,आरपीआयचे ईश्वर धुळे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. बहुसंख्य लोकांनी या सभेसाठी गर्दी केली होती.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

विरारच्या  यंग स्टार्स  ट्रस्ट  च्या नृत्य स्पर्धेत यु एस डी स्टार ग्रुप प्रथम .

विरार  :  गृहिणींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी  विरारच्या  यंग स्टार्स  ट्रस्ट तर्फे तालुकास्तरीय एकेरी नृत्य व समूह नृत्य स्पर्धा विरार कॉलेज...