ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
वसईत तिवरांची केली जातेय कत्तल, प्रशासन करतेय गुन्हे दाखल.पुढील कारवाई झिरो.
आताच शेयर करा
Mar 26, 2019

वसई : वसईत अनेक ठिकाणी भूमाफियांनी तिवरांची कत्तल करून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. प्रशासन फक्त गुन्हे दाखल करून आम्ही पर्यावरणाचे रक्षक असल्याचे भासवले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कारवाई शून्य केली जात असल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समिती चे समन्वयक समीर वर्तक यांनी केला आहे.

वसई खाडीकिनारी लाभलेली आसपासची तिवरांची झाडे संरक्षण कवचाप्रमाणे कार्यरत आहेत. मात्र सध्या या कांदळवनाची कत्तल होत असून विकासाच्या नावाखाली त्याचा ऱ्हास होत आहे. गेल्या तीन वर्षांत वसईमध्ये तिवरांच्या कत्तल झाल्याच्या अनेक घटना घडल्या असून त्या विरोधात विविध पोलिस ठाण्यांत एकूण नऊ गुन्हे दाखल झाले आहेत.

निसर्गापासून मिळालेल्या तिवरांच्या सुरक्षा कवचाची किंमत नसल्यामुळे पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेली वसईतील तिवरांची झाडे  नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सीआरझेड कायद्यानुसार कांदळवने असलेल्या भागाला संरक्षण असून या भागात कोणत्याही प्रकारे बांधकाम झाल्यास कारवाई करण्यात येते. खारफुटी वनस्पती हे वसई, नायगाव खाडी,भुईगाव, आगाशी किनाऱ्यालगतच्या भागाचे वैशिष्ट्य आहे. या नदीच्या खाडीच्या काठाने खारफुटी वनस्पतीचा मोठा पट्टा असून या क्षेत्रात वनस्पतींच्या विविध प्रजातींची कुळे आणि काही सस्तन प्राणी, खेकडे, कोळंबीचा समावेश आहे. मात्र सध्या वसईत कांदळवने नष्ट करून त्यावर अनधिकृत वाहनतळ, बहुमजली इमारती ही सर्व अतिक्रमणे वाढली आहेत. कांदळवन कक्षाची स्थापना झाल्यानंतर कांदळवन कक्षाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन यांनी मुंबई महानगर प्रदेश परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक ठिकाणाची पाहणी केली होती, त्यावेळी त्यामध्ये सात ठिकाणी कांदळवनांची मोठी हानी झाल्याचा अहवाल त्यांनी तयार केला होता. त्या सात क्षेत्रांत वसईतील भुईगावचा समावेश असल्याचे पर्यावरण संवर्धन समितीच्या समीर वर्तक यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांत वसई तालुक्यातील भुईगाव, उमेळे, रानगाव, आगाशी, मालोंडे, ससूनवघर या भागातील कांदळवने नष्ट केल्याचा घटना घडल्या आहेत. कांदळवनांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून ते क्षेत्र धोक्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून कांदळवने आणि पाणथळ जागा यांच्या संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे. त्यातील भुईगाव येथील पाणथळ जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. या प्रकरणावर सध्या कारवाई सुरू आहे. कांदळवन क्षेत्र कसे वाढेल, यावर समिती भर देत आहे. तसेच, या समितीच्या मोहिमेत सहभागी होत ज्या ज्या ठिकाणी कांदळवनाचा ऱ्हास होत असेल त्या याबाबत माहिती प्रशासनाला दिली पाहिजे असे आवाहन पर्यावरण संवर्धन समितीने केले  आहे.

गुन्ह्यांची यादी वर्षानुसार :

२०१६- २०१७ : ६ गुन्हे

२०१७-२०१८ : ० गुन्हे

२०१८-२०१९ : ३ गुन्हे

गुन्ह्यांची यादी विभागानुसार :

आगाशी : १ गुन्हा,मालोंडे : १ गुन्हा,ससूनवघर : १ गुन्हा,भुईगाव : ३ गुन्हे,उमेळे : २ गुन्हे , रानगाव : १ गुन्हा. दरम्यान वसई तहसीलदार किरण सुरवसे यांनी आम्ही नियमानुसार गुन्हे दाखल केले असून पुढील तपास कारवाई पोलिसांनी करायची आहे असे सांगितले.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

विरारच्या  यंग स्टार्स  ट्रस्ट  च्या नृत्य स्पर्धेत यु एस डी स्टार ग्रुप प्रथम .

विरार  :  गृहिणींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी  विरारच्या  यंग स्टार्स  ट्रस्ट तर्फे तालुकास्तरीय एकेरी नृत्य व समूह नृत्य स्पर्धा विरार कॉलेज...