ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
पालघर नगरपरिषदेत महायुतीचा विजय.गड आला पण सिंह गेला.
आताच शेयर करा
Mar 25, 2019

पालघर : पालघर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीने १९ जागांवर निर्विवाद विजय मिळवला असला तरी महायुतीचा गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. सोमवारी नगरपरिषदेच्या २६ जागांचे निकाल जाहीर झाले. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या डॉ.उज्ज्वला केदार काळे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार श्वेता पटाील यांचा त्यांनी पराभव केला. नगरपरिषदेसाठी रविवारी ६७ टक्के मतदान झाले होते. सर्व जागांचे निकाल हाती आल्यानंतर युतीने बाजी मारली असली तरी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे युतीची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे.

महायुतीतील शिवसेना, भाजप आणि रिपाइं या पक्षांनी पालघरची निवडणू्क प्रतिष्ठेची केली होती. महायुतीला विजय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, भाजपचे रवींद्र चव्हाण प्रचारासाठी आले होते. त्यातच पालघरची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच नगरपरिषदेची निवडणूक होत असल्याने महायुती आणि महाआघाडीने पूर्ण ताकद पणाला लावली होती.

संबंधित लेख

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.

मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती  मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...

मंगळवारी  वज्रेश्वरी येथे सत्संग मेळाव्याचे आयोजन.

वज्रेश्वरी :  श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा आयोजन समिती मुंबई च्या वतीने मंगळवार, दि. १८ मार्च २०२५  श्री क्षेत्र वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि.ठाणे...

देहेरजे प्रकल्पाच पाणी पेटणार,पाण्याच्या प्रत्येक थेंबा…थेंबा वर आमचा हक्क..

१२ वर्षापूर्वी १६५.२९ लाखांचं धरण झाल असत साधारण ३ हजार कोटी वाचले असते. धरण बांधण्यासाठी अनेक जागा उपलब्ध. इतर महापालिकेंना पाणी देण्यास आमचा विरोध...