ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या
आताच शेयर करा
Mar 25, 2019

बीड : परळी नगरपरिषदेच्या माजी नगरसेवकाची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. परळी येथील उड्डाणपुलाखाली पांडुरंग गायकवाड यांची तलवारीनं सपासप वार करून हत्या करण्यात आली. पहाटेच्या सुमारास काही अज्ञातांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गायकवाड यांची पत्नी राष्ट्रवादीची नगरसेविका आहे. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची अज्ञात इसमांनी पहाटेच्या सुमारास परळीतील उड्डाणलाखाली
त्यांच्या चेहऱ्यावर तलवारीनं वार करून हत्या करण्यात आली. या हल्ल्याचं नेमक कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र अंतर्गत वादातून ही हत्या करण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पांडुरंग गायकवाड यांच्या पत्नी मीनाबाई गायकवाड या राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत. या हल्ल्यानंतर मारेकरी फरार झाले असून पोलिसां त्यांचा शोध घेत आहे. 

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

विरारच्या  यंग स्टार्स  ट्रस्ट  च्या नृत्य स्पर्धेत यु एस डी स्टार ग्रुप प्रथम .

विरार  :  गृहिणींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी  विरारच्या  यंग स्टार्स  ट्रस्ट तर्फे तालुकास्तरीय एकेरी नृत्य व समूह नृत्य स्पर्धा विरार कॉलेज...