विरार : सध्याच्या व्यवसायिक सिनेमाच्या दुनियेत, आधुनिक काळातील बाप-लेकीच्या नात्यातील एक वेगळाच पैलू दर्शविणारा सिनेमा म्हणून आपण “चाहूल” या नवीन प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाकडे पाहू शकतो. ग्रामीण आणि शहरी भागातील दुरावा कमी करत. गैरसमजुतीतून – समजुती कडे नेणारा प्रवास दिग्दर्शक – नरेंद्र पाटील ह्यांनी या सिनेमात हळुवारपणे हाताळला आहे. याशिवाय सहजसुंदर अभिनय – अंगावर येणारे प्रासंगिक पार्श्वसंगीत आणि श्रवणीय गीत रचना ह्या “चाहूल” सिनेमाच्या जमेच्या बाजू आहेत.
सावकार, पुढाऱ्याची भूमिका अभिनेते सुनील गोडबोले ह्यांनी साकारली आहे. तर प्रमुख भूमिका तेलंगू अभिनेते पवन राठोड, अभिनेते सनिभूषण कलाकार वल्लारी कमलाकर, हार्दिक रामपुरे, सायली कारुलकर, संस्कृती जाधव, निशांत देसले, सारिका कुडे, भारती घोलप, कीर्ती पेंडसे, प्रियंका सोना आदी कलाकारांनी ह्या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत, नरेंद्र बा. पाटील (पत्रकार) निर्माता, दिग्दर्शक यांनी मन प्रोडक्शन च्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. कथा पटकथा नरेंद्र पाटील सवांद लेखन सौ. शिल्पा चऱ्हाटे, गीतकार स्वातीषा कदम, सौ. शिल्पा चऱ्हाटे तर डॉ. नेहा राजपाल, डॉ. विदयाश्री मांडवकर, सुप्रिया घाडीगावकर यांनी गीत गाईले. निर्मिती सहाय्यक समीर ढगे, छायाचित्रण संतोष डोंगरे, ध्वनी अश्विन धुरी, प्रकाशयोजना कृष्णा जोनवाल यांनी काम पाहिले. भयपट, रहस्यपट आणि विनोदीपट असे मिश्रण असलेला हा चित्रपट OTT प्लाटफोर्मवर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित होणार असून मराठी पत्रकाराकडून दिग्दर्शित झालेल्या ह्या चित्रपटाबाबत सर्वत्र कुतूहल आणि उत्सुकता लागून राहिली आहे.