ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ पत्रकार दि. वि. गोखले यांची जयंतीसाजरी .
आताच शेयर करा
Mar 26, 2024

मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार  दि. वि. गोखले यांची जयंती साजरी .

 मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार  दि. वि. गोखले यांची  १०१ वी जयंती  मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण  आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या वतीने मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली.  यावेळी वार्षिक पुरस्कार वितरण आणि वर्गाच्या ‘गरवारे दर्पण’ या अंकाचे प्रकाशन देखील करण्यात मुक्त पत्रकार आणि युद्धवार्ता अभ्यासक मल्हार गोखले  यांचे ‘युद्ध पत्रकार कसे व्हाल?’ या विषयावर व्याख्यान झाले.  त्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या युद्धांची पार्श्वभूमी आणि इतिहास मोठ्या रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगत युद्ध पत्रकारिता वार्तांकनाचे धडे दिले. पत्रकारिता वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला वर्गाचा  माजी विद्यार्थी सुजित शिर्के हा  यावर्षीचा दि. वि. गोखले  पुरस्काराचा मानकरी ठरला. वर्गाच्या माजी  विद्यार्थिनी  रेश्मा साळुन्खे यांना विद्याधर गोखले पुरस्कार तर  बाळकृष्ण परब यांना डॉ. अरुण टिकेकर पुरस्कार  प्रमुख पाहुणे मल्हार गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत आणि गरवारे व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण देखील या कार्यक्रमात झाले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक नंदा कोकाटे यांना, द्वितीय क्रमांक दिपाली मराठे, आणि तृतीय क्रमांक डॉ.मीनल आरेकर यांना मिळाला, तर विजय कामत आणि सिमरन दराडे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. हे पुरस्कार अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कोकण प्रांत अध्यक्ष आणि पत्रकार दुर्गेश सोनार तसेच संस्थेचे कार्यवाह प्रवीण देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकारिता वर्गाच्या वर्ग-समन्वयक  नम्रता कडू यांनी केले.डॉ.नरेंद्र पाठक आणि प्रशांत कुलकर्णी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. पुरस्कार विजेत्या माजी विद्यार्थ्यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

संबंधित लेख

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.

मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती  मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...

मंगळवारी  वज्रेश्वरी येथे सत्संग मेळाव्याचे आयोजन.

वज्रेश्वरी :  श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा आयोजन समिती मुंबई च्या वतीने मंगळवार, दि. १८ मार्च २०२५  श्री क्षेत्र वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि.ठाणे...

महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले 

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला, यावेळी महिलांनी कायद्याचा दुरुपयोग करू नये, योग्य वेळी कायद्याचा वापर...