ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
विरारच्या  यंग स्टार्स  ट्रस्ट  च्या नृत्य स्पर्धेत यु एस डी स्टार ग्रुप प्रथम .
आताच शेयर करा
Mar 19, 2024

विरार  :  गृहिणींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी  विरारच्या  यंग स्टार्स  ट्रस्ट तर्फे तालुकास्तरीय एकेरी नृत्य व समूह नृत्य स्पर्धा विरार कॉलेज मध्ये मोठ्या उत्साहात  संपन्न झाली. या स्पर्धेत ९५ संघांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७५ संघांनी सहभाग घेतला होता.  या स्पर्धेत यु एस डी स्टार ग्रुप ने प्रथम क्रमांक पटकावला तर एकेरी नृत्य स्पर्धेत मुक्ता कविणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आमदार हितेंद्र ठाकूर ,वसई जनता बँकेचे अध्यक्ष महेश देसाई ,परिवहन अध्यक्ष कल्पक पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

यंग स्टार ट्रस्ट  ने जगाच्या पाठीवर  इंडिया बुक ऑफ वर्ल्ड  रेकॉर्ड ,लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड , एक आगळेवेगळे उपक्रम राबवून अनोखा आदर्श निर्माण केला आहे. यंग स्टार्स  ट्रस्ट चे अध्यक्ष आमदार  हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली  समन्वयक अजीव पाटील यांनी  महिलांनी चूल आणि मुल यामध्ये अडकून न राहता  स्वतःचा छंद जोपासून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक स्त्री आणि पुरुषांना सुद्धा एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून अनेक स्पर्धांचे आयोजन केल जात. एकेरी नृत्य स्पर्धेत मुक्ता कविणकर प्रथम ,मनीषा मयेकर द्वितीय , नूतन कांबळे तृतीय क्रमांक पटकावला आहे. उत्तेजनार्थ म्हणून सोनल लोखंडे,सिद्धांती सोनावणे.यांना पारितोषिक देण्यात आले तर समूह नृत्य स्पर्धेत यु एस डी स्टार ग्रुप चे नृत्य दिग्दर्शक सुनील मराठे, अतुल बेलांमकर  यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहल लवू सावंत  वेदिका वैभव सावंत शितल संतोष पाटील ,रजनी तुषार गांधारे,रेश्मा विनोद पेडणेकर,मनाली बालु होडगे,स्नेहल सुनील माने,कल्याणी नरेश गायकवाड,वैदही विजय पावसकर,समिक्षा विजय साळवी यांनी नृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. गौरी सखी ग्रुप द्वितीय ,नृत्य निधी कलाकेंद्र तृतीय तर  राधाकृष्ण कलामंच ,इन्स्पिरेशन ग्रुप ला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून सुबल सरकार यांचे नातू कार्तिक पॉल व रिया परब यांनी काम पाहिले .

विरारच्या  यंग स्टार्स  ट्रस्ट  च्या नृत्य स्पर्धेत यु एस डी स्टार ग्रुप प्रथम .

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...