ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
महाराष्ट्र घडवण्यासाठी “महाराष्ट्र हाच धर्म” मानून आपण एकत्र यायला हवं ! दक्षिणेतील राज्यांचे मुख्यमंत्री दिल्ली समोर लोटांगण घालत नाही.२०२४ ला आपली सत्ता आणायची आहे – आदित्य ठाकरे.
आताच शेयर करा
Feb 15, 2024

  जळगाव  प्रतिनिधी  :-  युवासेनाप्रमुख  आदित्य ठाकरे यांचा ‘महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र’च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात झंजावात सुरू आहे. आज गुरुवारी आदित्य ठाकरे यांच्या जळगाव दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं . दरम्यान जळगाव, शिरसोली, कासोदा आणि भडगाव येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.. या सभेला लाखो शिवसैनिक आणि जळगावकर नागरिकांनी प्रतिसाद दिला . ठीक ठिकाणी जनतेने जंगी स्वागत केलं .

                एरंडोल येथील “महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र” मेळाव्यात उपस्थित जनसमुदाय पाहून खात्री पटली, जनतेचा आशीर्वाद आपल्यासोबतच आहे . असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की राज्यात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे . कारण सत्ताधाऱ्यांनी आपला महाराष्ट्र अस्थिर ठेवलाय . रोज नवे वाद, नवी आंदोलनं , अशा स्थितीत महाराष्ट्रात नवे उद्योग येणार कसे? घर पेटवून प्रगती होत नसते. भांडण लावून विकास होत नाही आणि समाजाला विखरून देश पुढे जात नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी, तरुणांच्या मनातला आश्वासक महाराष्ट्र घडवण्यासाठी “महाराष्ट्र हाच धर्म” मानून आपण एकत्र यायला हवं ! असं आवाहन त्यांनी जनतेला केलं..

२०२४ ला आपली सत्ता आणायची आहे – आदित्य ठाकरे

              देशातील अराजकता, अत्याचावर बोलतानाच जनतेला आदित्य ठाकरे यांनी आश्वासित केलं.. २०२४ हे आपलं वर्ष आहे, आपल्याला पुन्हा आपली सत्ता आणायची आहे . देशातील हे वातावरण भानायक होत चाललं आहे . महिलांवर अत्याचार वाढले आहेत . ज्या मंत्र्यांनी महिलांना टीव्हीवर शिव्या दिल्या त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार ?  वाद निर्माण करून ते जिंकतात . राज्यातील चित्र बसल्याचे असेल तर आपल्याला एकच पर्याय “उध्दव बाळासाहेब ठाकरे” ‘प्राण जाय पर वचन ना जाये’ हे उद्धव ठाकरे यांच धोरण आहे . त्यामुळे आपल्याला गद्दारांना गाडून आपलं सरकार आणावचं लागेल, असा निर्धार आदित्य ठाकफे यांनी व्यक्त केला ..

पक्ष फोडूनही तुमचे ४०० पार होणार नाही..!

               राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की ‘अपेक्षित असा निकाल आहे.. आमच्या बद्दल जो घोळ झाला तोच या ठिकाणी पण केला गेला आहे . अध्यक्ष हे काम करताना पक्षपात करत आहे हे धक्कादायक आहे . बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान त्यांनी केला आहे . पण पक्ष फोडूनही तुमचे ४०० पार होणार नाही . पवार साहेब जिद्दीने लढत आहेत. शून्यातून त्यांनी निर्माण केलंय . आता यांना महाराष्ट्रातील जनता उत्तर देईल . असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला . स्वामीनाथन यांना भारतरत्न, पण त्यांनी ज्यांच्यासाठी काम केलं त्यांच्यावर अत्याचार   दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आदित्य ठाकरे यांनी सविस्तर प्रतिक्रिया देताना म्हटलं की ‘दिल्लीत सेनेचा गरडा पडलाय . कोणाला येवढं  रोखण्यासाठी करत आहेत ? अन्न दात्याला ! जणू काय दहशतवादी आहेत ते . एका सभेत ड्रोन मधून अश्रू धूर सोडले . अरे स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला ,पण त्यांनी ज्यांच्यासाठी काम केलं त्यांच्यावर अत्याचार होत आहेत . हम बोले वो कायदा अशी देशात स्थिती आहे . राममंदिर झाले , पहिले मंदिर फिर सरकार म्हटल होतं . मंदिर झाल्यावर राम राज्य यायला पाहिजे होतं ,  पण असं शेतकऱ्यांवर लाठी हल्ला करून रामराज्य येणार नाही’ .

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...