भंडारी संस्थेचा हिरा हरपला, संतोष टेंबवलकर कालवश . ११ रोजी सर्व पक्षीय शोकसभा नालासोपारा : भंडारी संस्था वसई तालुका चे अध्यक्ष तथा उबाठा शिवसेनेचे नालासोपारा शहर अध्यक्ष संतोष टेंबवलकर यांचे शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरी वृक्ष परवा सृष्टी कॉम्प्लेक्स सेक्टर ३ गेट नंबर २ मिरा रोड पूर्व येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या जाण्याने वसई तालुक्यातील भंडारी समाजावरती शोककळा पसरली आहे तसेच संतोष चे नालासोपारा शहर अध्यक्ष असल्याने त्यांच्या जाण्याने अमी पार्क, पांचाळ नगर, लोढा नगर, नानांनानी ज्येष्ठ नागरिक ट्रस्ट मधील सर्व शिवसैनिक हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या विभागांमध्ये शाखा बांधण्यात त्यांचे मोठे योगदान होते तसेच प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर आयोजित करून विभागातील रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देत असत. गेली पाच वर्ष भंडारी समाजासाठी त्यांनी आपल्याला झोकून दिले होते. २८ जानेवारीला खेळ पैठणीचा वसईमध्ये भंडारी समाज आयोजित कार्यक्रमाला मोलाच मार्गदर्शन करून भंडारी समाज वास्तू उभारण्याचं कार्य हाती घेतल्याचा जाहीर केले होते.भंडारी समाजासाठी अनेक उपक्रम राबविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.हळदी कुंकू समारंभ, विद्यार्थी गुणगौरव समारंभ आणि भंडारी स्नेहसंमेलन, वृद्धाश्रमास भेट आणि ब्लँकेट चादर वाटप फळे वाटप,कोकणातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक साहित्य वाटप, संस्था वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक सत्कार आणि गुणवंत भंडारी बांधव यांचा सत्कार,भंडारी बंधू भगिनी यांना कोकण महोत्सव ठिकाणी स्टॉल उपलब्ध करून देण्यास सहकार्य, समाज बांधव विविध ठिकाणी असलेल्या आरोग्य क्षेत्रात सहभागी करणे त्याच त्याचा लाभ करून देणे, महामारीच्या कठीण परिस्थिती समाज उपयोगी उपक्रम राबविणे, समाजासाठी वधू वर सूचक केंद्र तसेच ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धा,तसेच निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजन,गरजू आणि गरजवंतांना आजारपणामध्ये मदत, सामाजिक चळवळी, रक्तदान शिबिरे, रोगनिदान शिबिरे घेऊन समाजसेवा, शासनाचे कायदे व योजना यांची माहिती पुरविणे,महाराष्ट्र शासनाचे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आणि बसचे मोफत पास मिळवून देणे.महाशिवरात्रीपासून पुढे चालणाऱ्या त्यांच्या नाना नानी पार्क कार्यक्रमाचे पूर्व नियोजन चालू होते अनेक शिवसैनिक कार्यकर्ते अनेक पक्षाचे नेते सामाजिक संस्थेचे पदाधिकारी त्यांचा मित्रपरिवार त्यांचे असलेले चाहते त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.भंडारी समाज संस्थेचे कार्याध्यक्ष जयवंत रूमडे यांनी त्यांच्या जाण्याने वसई तालुक्यातील भंडारी समाज पोरका झाला आहे असे श्रद्धांजली वाहताना उद्गार काढले आहेत यावेळी भंडारी समाजाचे कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ४:०० वाजता चक्रधर नगर, नाना नानी पार्क, नालासोपारा (प.) येथे शोकसभा आयोजित केली असून सर्व पक्षाचे राजकीय नेते तसेच त्यांचे हितचिंतक नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांनी उपस्थिती दाखवावी असे आवाहन भंडारी संस्था वसई तालुका यांनी केले आहे.

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.
मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...