“राष्ट्रवादी काँग्रेस,शरद पवार गटाच्या शिक्षक सेल संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.गौतम सुखधाने ची निवड”.
नालासोपारा : शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे आणि शिक्षक कर्मचारी वृंदवर्ग, विद्यार्थ्यांमध्ये सु परिचित असणारे, वसईचे लोकप्रिय, विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि दहिसर पूर्व येथील कोकणी पाडातील शिवंडावकर हायस्कूल (तांबे एज्युकेशन ट्रस्ट) येथील नामवंत शैक्षणिक संस्थांमधील कार्यरत असणारे आदर्श शिक्षक प्राध्यापक गौतम सुखधाने यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दहिसर (मुंबई) विभाग शिक्षक सेल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सुखदाने सर आपल्या परिश्रमाने आणि मेहनतीच्या जोरावर बुलढाणा सारख्या छोट्याशा शहरातून तळागाळातून पुढे आलेलं व्यक्तिमत्व आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा ते जतन करताना शिका”, संघटित व्हा,आणि संघर्ष करा” हे रुजवितात.त्यामुळे ते उपेक्षित वंचित घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून संधी मिळवून देण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. उपेक्षित वंचित घटकाला समाजातील शैक्षणिक दृष्टिकोनातून प्रगल्भ करण्याचा ध्यास आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये. शिक्षण हा सर्वांचा अधिकार असला पाहिजे. आणि त्यासाठी ते नेटाने सातत्याने प्रयत्नशील असतात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे समन्वयक म्हणून ते अनेक वर्ष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.त्यामुळे ते विविध वयोगटातील व्यक्ती आणि विद्यार्थीनी परिचयाचे आहेत. त्यांच्या या निवडीने शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवाचा आणि योगदानाचा पक्ष संघटनेला निश्चितच फायदा होईल असे जाणकार आपले मत व्यक्त करतात.

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.
मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...