ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
वसई विरार शहर महानगरपालिके ने राबवली सखोल स्वच्छता मोहीम.
आताच शेयर करा
Jan 20, 2024

नालासोपारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दि.२० जानेवारी २०२४ पासून वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात  सखोल स्वच्छता मोहीमेचा  शुभारंभ  प्रभाग समिती ‘ए’ बोळींज कार्यक्षेत्रापासून करण्यात आला. शनिवार, दि.२०/०१/२०२४ रोजी  “गोकुळ टाऊनशीप गेट, पोलीस बीट चौकीजवळ, बोळींज, विरार (पश्चिम)” या ठिकाणी सकाळी ०७.०० वाजल्या पासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. प्रभागाच्या हद्दीतील गावठण, विराट नगर, बोळींज नाका ते राम मंदीर, बोळींज नाका ते खारोडी गाव, जकात नाका ते म्हाडा, जकात नाका ते मानसी मल्लीका शॉप, गोकुळ टाऊनशिप, खारोडी नाला ते जकात नाका (पराग मेडीकल), जकात नाका ते विवा कॉलेज, विजय वल्लभ हॉस्पिटल ते न्यु विवा कॉलेज, पेट्रोल पंप ते कलावती मंदीर ते विवा कॉलेज या ठिकाणचे मुख्य रस्ते, उप-रस्ते, फुटपाथ इ.ची साफसफाई करण्यात आली तसेच ते पाण्याने स्वच्छ धुण्यात आले. या मोहिमेत महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता दूत, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी, विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, मान्यवर नागरिक इ.यांनी सहभाग घेतला.        सदर सखोल स्वच्छता मोहीम ही महानगरपालिका क्षेत्रात दर शनिवारी सकाळी ०७ ते ११ या वेळेत प्रभाग निहाय टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल व मोहीम अशीच पुढे सुरु राहील.  असे वसई विरार महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...