ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
विजेच्या समस्येवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाचा महावितरणला निवेदन.
आताच शेयर करा
Jul 17, 2023

विरार ( प्रतिनिधी )विरार शहरात कोपरी, चंदनसार, साईनाथ नगर, जिवदानी रोड, फुलपाडा, नाना नानी पार्क, मनवेल पाडा, कारगिल नगर अशा अनेक विभागात पावसाळ्या दरम्यान विद्युत समस्या निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी शिवसेना विरार शहर शाखेकडे नागरिकांकडुन येत आहेत. रात्री अपरात्री विज खंडित होणे, ट्रान्सफर्मरचा स्पोर्ट होणे, विद्युत तार तुटणे असे अनेक प्रकार विरार शहरात पावसाळ्या दरम्यान होताना दिसून येत आहेत. असाच एक प्रकार मागील ०२ महिन्यांपुर्वी ट्रांसफर्मर ला सुरक्षा कवच नसल्याने कारगिल नगर मध्ये मोठा अपघात घडून ०२ तरूणा़चा दुर्दैवी मृत्यु झालेला होता. तसेच ०२ ते ०४ दिवसापुर्वी मनवेलपाडा, फुलपाडा येथील चालु विद्युत वाहिन्या तुटुन जमिनीवर पडल्याचे निदर्शनास आले. पण सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

याची दखल घेऊन पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख व उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे विरार शहर प्रमुख उदय अरूण जाधव यांच्या नेतृत्वाखालील विरार शहराच्या शिष्टमंडळाने विज वितरण कंपनीचे अति.अभियंता मुकुंद देशमुख यांची भेट घेऊन विरार शहरातील नागरिकांना भेडसवणार्या विजेच्या विविध समस्यांवर चर्चा केली तसेच वैतरणा, कसराळी गाव ते मनवेलपाडा दरम्यान खुल्या असलेल्या रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मरला लवकरात लवकर सुरक्षा कवच बसवणे, मोडकळीस आलेले विद्युत खांब बदलणे, जुन्या झालेल्या विद्युत तारा बदलुन नवीन बसवणे, विरार शहरातील अनेक गावांमधून होणारी विज चोरी थांबवणे अशा अनेक महत्त्वाची कामे लवकरात लवकर पुर्ण करून घ्यावीत असे निवेदन देण्यात आले तसेच या विषयावर जर त्वरीत कारवाई झाली नाही तर मग शिवसेनेला विरार शहरात नागरिकांना होणार्या विजेच्या समस्येमुळे मोठे आंदोलन उभारावे लागेच. मग याची पुढील सर्व जबाबदारी एमएसइबीची असेल. यावेळी शिष्टमंडळात महिला शहरसंघटक सौ.शिला लष्करे, विधानसभा अधिकारी राम मैती, विभागप्रमुख जितेंद्र खाडे, स्वप्नील मोरे, महेंद्र सकपाळ, नरेंद्र पाटील, अजय पिंपळे, उपविभागप्रमुख सुनील चव्हाण, अभिजीत घाडगे, महिला आघाडी उपशहरसंघटक सौ.मानसी दळवी, सौ.रोशनी जाधव, सौ.साक्षी जाधव, शाखाप्रमुख सुशांत घाग, संजय चव्हाण, सुनील कुटवड, जिवराज कोकिटकर, प्रितम रावराणे, रविराज तेंडुलकर, गट प्रमुख दिनेश आदवडे, विकास राणे, शहर अधिकारी हर्षल गुरव, विभाग अधिकारी करण गोसावी, गौरव कलांगण आदि पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...