विरार : विरार मराठी व्यापारी मंडळ पुरस्कृत श्री स्वामी समर्थ विवाह मंडळ आयोजित वधु-वर मेळावा रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ०७ वाजता. हिंदु समाज मंडळ हॉल, टोटाले तलाव, नगरपालिका वाचनालय ,विरार पूर्व येथे घेण्यात येणार असून हा मेळावा मोफत असणार आहे.
सर्व जातींसाठी, प्रथम वधु-वर, घटस्फोटीत, विधुर, विधवा, अशा असंख्य वधु-वरांसाठी आपला जोडीदार निवडण्यासाठी वरील संस्थाच्या पुढाकाराने हा वधु-वर मेळावा होऊ घातला आहे. विरार मराठी व्यापारी मंडळ पुरस्कृत श्री स्वामी समर्थ विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषिक सर्व जातींसाठी हा विवाह मेळावा असेल आजच नाव नोंदणी करा अगदी मोफत असून येथे कोणतेही वधु-वर यांचे प्रदर्शन भरविले जाणार नाही तर अगदी दोघांच्याही ओळखीची गुप्तता पाळण्याचा प्रयत्न मंडळाचा असेल. या मेळाव्यात वधु-वर यांची उपस्थिती आवश्यक राहील. सोबत फक्त एक वा दोन पालकांना उपस्थित राहता येईल. मोफत नोंदणी साठी श्री स्वामी समर्थ कोकण वधूवर सूचक केंद्र गाला नं ४ लक्ष्मी अपार्टमेंट लक्ष्मी पार्क राधा नगर तुळींज रोड नालासोपारा पूर्व येथे ९६३७०६८८२० तर श्री स्वामी समर्थ कोकण वधूवर सूचक केंद्र शॉप ००१ सागर झेरॉक्स, विरार पोलीस ठाण्याच्या बाजूला मच्छी मार्केट समोर विरार पूर्व., ,८४५९४७१६३८,८९८३०४४८५३ या नंबर वर संपर्क साधावा. नोंदणी करिता बायोडाटा आणि फोटो आवश्यक राहील असे विवाह मंडळाच्या साक्षी परब यांनी सांगितले आहे.